राज्य शिक्षक पुरस्काराचे सोलापुरात वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 07:50 PM2017-09-16T19:50:33+5:302017-09-16T19:50:57+5:30
शालेय शिक्षण व क्रीडा विभागतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या यंदाचे (२०१६-१७) राज्य शिक्षक पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण सोमवार 18 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे होणार आहे.
मुंबई दि. 16– शालेय शिक्षण व क्रीडा विभागतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या यंदाचे (२०१६-१७) राज्य शिक्षक पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण सोमवार 18 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे होणार आहे.
सोलापूर हुतात्मा स्मृती मंदीरात सकाळी 11 वाजता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांची विशेष उपस्थिती या सोहळ्या प्रसंगी राहणार आहे.
यंदाच्या राज्य शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाने घोषित केले असून सोमवार दि. १८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एकुण राज्यभरात १०७ शिक्षकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक प्राथमिक शिक्षक, एक माध्यमिक शिक्षक, प्रत्येक विभागातून एक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, राज्यातून एक कला शिक्षक, एक क्रीडा शिक्षक, एक स्काऊट शिक्षक, एक गाईड शिक्षिका यांना पुरस्कार दिले जातात. राज्यातून १ पुरस्कार अपंग प्रवर्गासाठी देण्यात येतात.