राज्यात जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरु, रेड अन् कंटेन्मेंट झोनमध्ये बंदच 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 06:17 PM2020-05-21T18:17:36+5:302020-05-21T18:53:20+5:30

परिवहनमंत्री परब पुढे म्हणाले की, २३ मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बससेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे.

District bus service started in the state, closed in red zone and cantonment zone, anil parab MMG | राज्यात जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरु, रेड अन् कंटेन्मेंट झोनमध्ये बंदच 

राज्यात जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरु, रेड अन् कंटेन्मेंट झोनमध्ये बंदच 

Next

मुंबई ( २१ मे ) कोरोना महामारीचा फैलाव  रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून उद्या दि. २२ मे  पासून  जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली आहे.  

परिवहनमंत्री परब पुढे म्हणाले की, २३ मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बससेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या कालखंडामध्ये राज्यशासनाने  रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता काही अटीशर्तींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्या-अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर उद्यापासून एसटी बस सेवा सुरु होत आहे. अर्थात, त्यासाठी खालील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.  
१. जिल्हा-अंतर्गत सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत हि बस सेवा सुरु राहील. 
२. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील. 
३. सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. 
४.जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही.   (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून ) 
५. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना  सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.   
६. प्रवासामध्ये प्रत्येक  प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

वरील अटी व शर्तींचे काटेकोरपाने पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन मंत्री, अॅड. अनिल परब यांनी केले आहे 
 

Read in English

Web Title: District bus service started in the state, closed in red zone and cantonment zone, anil parab MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.