२६, २७ जुलैच्या पावसामुळे परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची 'फेरपरीक्षा' - आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 06:52 AM2019-08-03T06:52:32+5:302019-08-03T06:52:52+5:30

आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

District collectors have the right to leave schools in case of emergency | २६, २७ जुलैच्या पावसामुळे परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची 'फेरपरीक्षा' - आशिष शेलार

२६, २७ जुलैच्या पावसामुळे परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची 'फेरपरीक्षा' - आशिष शेलार

Next

मुंबई : पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन संपूर्ण जिल्हा अथवा काही भागातील शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शिवाय २६, २७ जुलैच्या पावसामुळे ज्यांना परीक्षेस बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत.

राज्याच्या विविध भागांत सध्या पावसाचा जोर वाढला आहे. अनेकदा संततधार पावसामुळे पाणी साचून जनजीवन विस्कळीत होते. अतिवृष्टी, पूर परिस्थिती आदींमुळे अनेकदा विद्यार्थी आणि शिक्षकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आपत्तीच्या पूर्वसूचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठरावीक भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहेत.
याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले. यापूर्वी हा अधिकार शालेय शिक्षण विभागाला होता. मात्र, आता हा अधिकार जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे.

पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्यास आणि त्या दिवशी परीक्षा असल्यास त्या दिवसाच्या परीक्षेचे पुनर्नियोजन करून फेरपरीक्षा घेण्यात यावी. शाळास्तरावरील फेरपरीक्षेचे अधिकार मुख्याध्यापकांना तर बोर्डाच्या परीक्षा घेण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना राहतील, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा न देऊ शकणाºया विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

२६ आणि २७ जुलैदरम्यान बदलापूर, कर्जत भागात पावसामुळे वाहतूककोंडी झाल्याने काही विद्यार्थी वेळेत परीक्षेला पोहोचू शकले नव्हते. यात दहावी, विज्ञान भाग २, इतिहास, समाजशास्त्र; १२ वी समाजशास्त्र, बालविकास सहकार, टंकलेखक, लघुलेखक यापैकी ज्या परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश शेलार यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

Web Title: District collectors have the right to leave schools in case of emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.