सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कॉँग्रेसने ५० पैकी २७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी जिल्हा परिषदेमधील ‘राणे राज’ कायम राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. राज्यातील युतीच्या सत्तेतील मित्र पक्ष असलेले शिवसेना आणि भाजपचे जाहीर वस्त्रहरण राष्ट्रीय काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केल्याने राज्यभर गाजलेल्या या निवडणुकांच्या निकालाकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून या मतमोजणीच्या कामाला सुरुवात झाली आणि आता काय निर्णय येणार याकडे सर्वांचीच उत्सुकता ताणली होती.सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५० पैकी ३३ जागा या काँग्रेसकडे होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या ५ आणि शिवसेनेच्या २ जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हे संख्याबळ ४0 झाले होते. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे काँग्रेसने गड राखला असला तरीही काँग्रेसच्या तब्बल १३ जागा कमी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर यश मिळाले आहे. शिवसेनेने ४ जागांवरून १६ जागांवर गरूडझेप घेत चौपट यश मिळविले. भाजपने ३ जागांवरून दुप्पट यश मिळवित ६ जागांपर्यंत मजल मारली आहे. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत ३ जागी असलेल्या भाजपला आता ६ जागा मिळाल्या असल्या तरी अपेक्षित यश मिळालेले दिसून येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुडाळ येथे प्रचारसभा होऊनही त्याप्रमाणात भाजपला यश मिळालेले नाही. देवगडमध्ये भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत, तर दोडामार्ग आणि सावंतवाडी आणि वैभववाडीत १ जागा मिळाली आहे.मनसेच्या नशिबी भोपळाजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेने आपला प्रभाव टाकू शकली नाही. सिंधुदुर्गात राजन दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या मनसेने भोपळा फोडला नाही. त्यांच्या नशिबी अपयशच आले आहे.पं. स.मध्ये सेना-भाजपची मुसंडीकॉँग्रेसला तीन, शिवसेना-भाजपला चार ठिकाणी सत्तासिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ८ पंचायत समित्यांचे निकालही जाहीर झाले असून, ३ पंचायत समित्यांवर काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे, तर उर्वरित ५ पंचायत समितींपैकी चार ठिकाणी सेना-भाजप आघाडीवर आहे. शिवसेना-भाजप युतीचीच सत्ता या ठिकाणी येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील ६ पंचायतींवर यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती. तर वेंगुर्ले आणि दोडामार्ग या दोन पंचायत समितींवर सेना-भाजपची सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला ८ पैकी मालवण, कणकवली, आणि सावंतवाडी या तीन तालुक्यांमधील पंचायत समित्यांमधील सत्ता राखणे शक्य झाले आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कुडाळ आणि देवगड या दोन पंचायत समित्यांवर सेना-भाजपने वर्चस्व मिळविले आहे. या निवडणुकीत मात्र मनसेला खातेही उघडता आलेले नाही.कुडाळात काँग्रेसच्या सत्तेत परिवर्तन झाले असून या ठिकाणी शिवसेनेने बाजी मारली आहे. मालवणात काँग्रेसने गड राखला आहे. देवगड तालुक्यात सत्तेत परिवर्तन करत सेना-भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवित मुसंडी मारली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीत पुरती वाताहात झाली असून केवळ दोडामार्गमधील एक जिल्हा परिषदेची जागा आणि एक पंचायत समितीची जागा आणि मालवणमधील एक पंचायत समितीची जागा अशा तीनच जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. (प्रतिनिधी)निवडणूक विशेषदोडामार्गात सेना-भाजपची बाजी - ककजिल्हा परिषदेत कॉँग्रेसची हॅट्ट्रीक - हॅलो १वैभववाडीत युतीची मुसंडी - हॅलो २जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार हॅलो २दहा महापालिकांचा कौल - ५
जि. प.मध्ये ‘राणे राज’ कॉँग्रेसने सत्ता राखली;
By admin | Published: February 23, 2017 11:52 PM