जिल्ह्यात अद्याप ७६.८० मिमी पावसाची नोंद
By admin | Published: June 13, 2014 11:40 PM2014-06-13T23:40:22+5:302014-06-13T23:40:22+5:30
रायगड जिल्ह्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली असली तरी पाण्याची तहान भागवणारा आणि शेतीला उपयुक्त असा दमदार पाऊस अद्याप सुरु झालेला नाही
Next
अलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली असली तरी पाण्याची तहान भागवणारा आणि शेतीला उपयुक्त असा दमदार पाऊस अद्याप सुरु झालेला नाही. गेल्या १ ते १३ जून या १३ दिवसांच्या काळात जिल्ह्यात केवळ एकूण ७६.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत रायगड जिल्ह्यात मुरुड येथे २० तर अलिबाग येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित ठिकाणी तळा येथे ६ मिमी, रोहा व पोलादपूर येथे २ मि.मि. तर पेण, उरण, कर्जत, खालापूर, माणगांव, पाली, महाड, म्हसळा, श्रीवर्धन व माथेरान येथे एक मिमी देखील पाऊस झालेला नाही. पनवेलमध्ये पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे उष्मा काहीसा कमी झाला आहे. (विशेष प्रतिनिधी)