जिल्हानिहाय कोरोना तपासणी प्रयोगशाळा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:53 PM2020-04-06T16:53:39+5:302020-04-06T16:54:09+5:30

कोरोना संसर्गाचे निदान आणि तपासणीसाठी जिल्हानिहाय प्रयोगशाळांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.

District-wise Corona Investigation Laboratory Announces | जिल्हानिहाय कोरोना तपासणी प्रयोगशाळा जाहीर

जिल्हानिहाय कोरोना तपासणी प्रयोगशाळा जाहीर

Next

मुंबई :  कोरोना संसर्गाचे निदान आणि तपासणीसाठी जिल्हानिहाय प्रयोगशाळांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी याची घोषणा केली.

 ही यादी पुढीलप्रमाणे -

 1. मुंबई महानगर महापालिकेकरिता - प्रयोगशाळा-  कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई.

 2. ठाणे जिल्ह्याकरिता - रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा - ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई

 3. पालघर जिल्ह्याकरिता -  उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा-  हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई

 4.  सातारा जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

 5. पुणे जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे

 6. अहमदनगर जिल्ह्याकरिता व  नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) - प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे

 7. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली

 8. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद -  या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

 9. धुळे, जळगाव, नंदुरबार,  नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका)  - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा -   

   श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे

 10. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,  बीड  - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

 11. अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशिम, यवतमाळ - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर

 12.  नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर

Web Title: District-wise Corona Investigation Laboratory Announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.