मुंबई : उपनगरातील लोकसंख्या वर्षागणिक वाढत आहे. सेवा सुविधांवरील ताण वाढत आहे. मुंबईत दोन पालिका आयुक्त नेमण्यात यावेत, अशी मागणी गेले अनेक वर्षे केली जात होती. अखेर लोकसंख्या अधिक असलेल्या विभागांचे विभाजन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या विभाजनाची सुरुवात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पी उत्तर विभागापासून झाली आहे. यानंतर एल पूर्व आणि के पूर्व या विभागांचे दोन भाग होणार आहेत.मुंबईत प्रति कि.मी. २६ हजार ५०० लोकवस्ती आहे. यापैकी शहर भागात सर्वाधिक ४४,१७०, वांद्रे ते दहिसर २४,५०० आणि कुर्ला ते मुलुंड- प्रति कि.मी २२,११० लोक राहतात. १९५६ मध्ये अंधेरी ते दहिसर आणि घाटकोपर ते मुलुंड हे भाग महापालिकेत विलीन करण्यात आले. लोकसंख्या वाढत गेल्याने सहा विभागांचे विभाजन २१ विभागांमध्ये तर सन २००० मध्ये एकूण २४ प्रशासकीय विभाग करण्यात आले. मात्र, गेल्या दोन दशकांमध्ये मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आता सव्वा कोटींहून अधिक झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे.मुंबईतील सर्वाधिक म्हणजे नऊ लाख ६७ हजार लोकसंख्या असलेल्या पी उत्तर विभागाचे विभाजन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. मालाड, मालवणी परिसर असलेल्या पी उत्तर विभागात १७ नगरसेवक आहेत. येथील ७० टक्के विभाग झोपडपट्टी भागात आहे. लोकसंख्या अधिक असूनही विभाग मात्र एकच असल्याने वैद्यकीय, पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांवरही ताण पडत आहे. त्यामुळे या विभागाचे आता पी पूर्व आणि पी पश्चिम अशी विभागणी करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने आगामी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एल (कुर्ला ) विभागात नऊ लाख २६ हजार लोकसंख्या आहे, तर के पूर्व (जोगेश्वरी, अंधेरी पूर्व) या विभागात ८.५ लाख लोकसंख्या आहे. या विभागाचेही लवकरच विभाजन केले जाणार आहे.मुंबई - ४८३.१४ चौ. कि.मी. क्षेत्रफळलोकसंख्या १.२८ कोटीपश्चिम उपनगर ५७.१८ लाखपूर्व उपनगर ३९.६३ लाखशहर ३१.९२ लाखनगरसेवक २२७पश्चिम १०२पूर्व ५९शहर ५६एक आयुक्त, चार अतिरिक्त आयुक्त, २४ सहायक आयुक्त, शहर आणि पश्चिम उपनगरात पाच तर पूर्व उपनगरात सात प्रभाग समित्या आहेत.
लोकसंख्या वाढल्यामुळे तीन विभागांचे विभाजन; प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 3:09 AM