मुंबई : जिद्द असली की कितीही चढउतार, यशापयश समोर येवोत... मात्र, कधीतरी मेहनतीचे फळ मिळतेच. असे काहीसे चित्र जुहू येथील ‘कॅफे अर्पण’ येथे पाहायला मिळत आहे. जागतिक दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर या कॅफेला भेट दिली असता, एक वेगळ्याच पद्धतीची सकारात्मक ऊर्जा आपल्या भेटीला येते, इथे भेटणारा प्रत्येक जण म्हणतोय, आम्हाला सहानुभूती नकोय, संधी द्या! याच उक्तीवर खरे उतरणारे हे कॅफे अत्यंत प्रेरणादायी आहे.मुंबईतील १२ दिव्यांगांनी एकत्र येऊन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. बऱ्याचदा स्वमग्नता असणाºया व्यक्तींना मुख्यप्रवाहात स्वीकारले जात नाही. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, शिवाय सर्व स्तरांतून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने नैराश्यही वाट्याला येते. मात्र, यश चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने हे स्वप्न वास्तवात साकारले आहे. याविषयीट्रस्टच्या विश्वस्त आशिता महाजन यांनी सांगितले की, पहिल्याटप्प्यावर २०१५ साली डबे पुरविण्याच्या सेवा एकत्र येत सुरू केली. त्याचा प्रतिसाद आणि यश पाहिल्यानंतर कॅफे सुरू करण्याचे ठरविले. मात्र, आर्थिक भार कसा उचलायचा, याकरिता आॅनलाइन क्राउड फंडिंगचा आधार घेतला. आता या ठिकाणी १२ स्वमग्न व्यक्तींना दिवसभरात पाच तास वेगवेगळ्या पाळ्यांत काम करावे लागते. मात्र, कामाची पूर्ण जबाबदारी त्यांची असते.या कॅफेमध्ये काम करणाºयाराम भिवंडीकर यांनी सांगितले की, अनेक वर्षे प्रयत्न करूनही कोणीच नोकरी देत नव्हते. त्यामुळे बºयाचदा नैराश्य यायचे, शिवाय आत्मविश्वासही गमावला होता, परंतु या व्यासपीठामुळे पुन्हा एकदा आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण झाली आहे. या कॅफेत चहा, कॉफी करतो. ग्राहकांशी गप्पा मारतो, या सगळ्यात मला खूप आनंद मिळतो.>मुख्य प्रवाहात जागा हवीशारीरिक वा मानसिक व्यंग असो, समाज म्हणून आपण अशा व्यक्तींना स्वीकारले पाहिजे. या व्यक्तींसाठी संधी निर्माण करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही आपलीच जबाबदारी आहे. गेले काही महिने या कॅफेमध्ये काम करणाºया व्यक्तींच्या आत्मविश्वासात आणि व्यक्तिमत्त्वात कमालीचे बदल झाले आहेतच. हेच आमच्या या यशाचे गमक आहे. माझी स्वत:ची मुलगी स्वमग्न आहे, मी काही काळ परदेशात होते. तिकडेही अशा प्रकारचा प्रयोग केला होता, त्याला यश मिळाले. त्यानंतर, पुन्हा मायदेशी येऊन अशा पद्धतीने काम करावे, असे ठरविले. त्यातून हा कॅफे साकारला आहे.- डॉ. सुषमा नगरकर, व्यवस्थापकीय विश्वत आणि मानसोपचारतज्ज्ञ.
दिव्यांगांनी एकत्र येत सुरू केलेले अनोखे ‘कॅफ अर्पण’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 2:52 AM