दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीमधून मिळणार अकरावी प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:07 AM2021-02-13T04:07:41+5:302021-02-13T04:07:41+5:30
शालेय शिक्षण विभाग ; कर्णबधीर मुलांप्रमाणे मिळणार सवलत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कर्णबधिर व इतर एटीकेटी विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग ...
शालेय शिक्षण विभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्णबधिर व इतर एटीकेटी विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थ्यांनाही अकरावीचा प्रवेश सुलभ होणार आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांप्रमाणेच अंशतः अंध, पूर्णतः अंध, गतिमंद, अस्थिव्यंग, बहुविकलांग, अध्ययन अक्षम, स्वमग्न, सेरेबल पाल्सी अशा विविध आजाराने ग्रासलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या सवलतींद्वारे अकरावी प्रवेशाची सुविधा आणि दहावीत इंग्रजी विषय स्वतंत्रपणे घेऊन उत्तीर्ण होण्याच्या निर्णयाला शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव, संचालक यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अकरावी प्रवेशासाठी इंग्रजी विषयासह किमान ५ विषयांत उत्तीर्ण होणे नियमांप्रमाणे आवश्यक आहे
....................