Join us

दिवाळी : वायू प्रदूषणामुळे कोरोना वाढणार; रुग्णालय सज्ज ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 4:12 PM

Diwali News : लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपचार करता येणे शक्य होईल.

मुंबई : मुंबईकरांच्या काळजीपोटी प्रमुख रुग्णालयातील भाजलेले वॉर्ड सुसज्ज ठेवावे, जेणेकरून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपचार करता येणे शक्य होईल. दिपावलीच्या काळामध्ये ध्वनी व वायू प्रदूषणामुळे कोरोना संक्रमितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

२५ ऑक्टोबर २०१६ च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आवाजाचे व हवेत उडणारे फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. रहिवासी क्षेत्रातील फटाके दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत असेल तर त्यांच्या दुकानांची तपासणी करा, असे निर्देश परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिली. दरम्यान, मर्यादित स्वरूपाच्या परवानगीतच दिपावली सण साजरा करावा. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे. 

_______________

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुलझडी, अनार यासारखे मर्यादित स्वरूपात फटाके फोडण्यास राज्य शासन व महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता मुंबईकर नागरिकांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे.

- किशोरी पेडणेकर, महापौर

_______________

दिवाळसण साजरा करताना शारीरिक दुरीकरण पाळणे, वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे आणि घराबाहेर पडताना किंवा घरी पाहुणे आले असल्यास त्यांच्यासह सर्वांनी सुयोग्यप्रकारे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

_______________

ज्यांच्या घरी गेलो आहोत, त्यांचा रुमाल वापरण्याऐवजी स्वतःचा रुमाल वापरावा. तसेच घरात प्रवेश करताना व प्रवेश केल्यानंतर मास्क परिधान करावा.

_______________

१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी लहान मुले फुलझडी अगर अनार फटाके फोडणार असल्यास ती मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे बंधनकारक आहे. तसेच अशावेळी पाण्याने भरलेली मोठी बादली, साबण व सुती रुमाल अगर पंचा सोबत असावा.

 

टॅग्स :दिवाळीप्रदूषणहवामानमुंबईमुंबई महानगरपालिका