मुंबई : राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ३२.५० टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज याबाबतची घोषणा केली.गुरुवारच्या निर्णयानुसार महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीनही कंपन्यांतील कर्मचाºयांना पूर्वीच्या मूळ वेतनाच्या ३२.५० टक्के तर विविध भत्त्यांमध्ये १०० टक्के वाढ करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री, तिन्ही कंपन्यांचे अधिकारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींमधील आजच्या बैठकीत या वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयाचा फायदा राज्यातील पूर्णवेळ आणि कंत्राटी अशा ९५ हजार कर्मचाºयांना होणार आहे.
मूळ वेतनामध्ये ३२.५० टक्के वेतनवाढीसोबत १२५ टक्के महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये समाविष्ट करण्यात येईल. तांत्रिक व अतांत्रिक साहाय्यक प्रवर्गाच्या कर्मचाºयांच्या मानधनातही वाढ करण्यात आली असून आता त्यांना पहिल्या वर्षी १५ हजार, दुसºया वर्षी १६ हजार तर तिसºया वर्षी १७ हजार रुपये एवढे मानधन मिळेल. कंत्राटी कर्मचाºयांना किमान वेतनाशिवाय २० टक्के अतिरिक्त वाढ देण्यात येणार आहे. याशिवाय वर्ग ४ च्या तांत्रिक कर्मचाºयांच्या मूळ वेतनामध्ये ५०० रुपये वाढ करण्यात आलेली आहे.वाहनांच्या वापराप्रमाणे पेट्रोल भत्ताकर्मचारी अपघात विमा योजना व ग्रुप टर्म इन्शुरन्स विम्याची रक्कम १० लाखांवरून २० लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे. कर्मचाºयांना मोबाइल अॅपद्वारे मीटर रिडिंग घेण्याकरिता त्यांच्या वाहनाच्या वापराप्रमाणे पेट्रोल भत्ता देण्यात येणार आहे.