Join us

अतिक्रमण मुक्त झालेल्या माहीम किल्ल्यावर होणार दीपावली महोत्सव; मंत्री लोढा यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 4:37 PM

हा कार्यक्रम दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी  ६ वाजता सुरु होणार आहे.

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात  १ आणि २ ऑक्टोबर २०२३ रोजी गड-किल्ले स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचा कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभाग आणि विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील शिवडी किल्ल्यावर करण्यात आले. या मोहिमेच्या अनुषंगाने नुकत्याच अतिक्रमण मुक्त झालेल्या माहीम किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त दीपावली महोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. हा कार्यक्रम दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी  ६ वाजता सुरु होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने 'गड किल्ले स्वच्छता अभियान' सुरू केले असून, ज्या अंतर्गत आयटीआयचे ३ लाख विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असलेल्या ३५० किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेतली. मुंबई शहरात आणि उपनगरात ४ ऐतिहासिक किल्ले असून, येथे देखील स्वच्छता मोहीम राबवली गेली. त्यापैकी माहीम किल्ल्यावर अतिक्रमणाची समस्या होती. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने माहीम किल्ला अतिक्रमण मुक्त करण्यात आला असून, आपल्या कल्पनेपेक्षा सुंदर असलेल्या या माहीम किल्ल्यावर १० नोव्हेंबर रोजी सर्वांनी मोठ्या संख्येने दीपावली उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन पालकमंत्री लोढा यांनी केले आहे.

टॅग्स :दिवाळी 2023मंगलप्रभात लोढामुंबई