आवारपाडा पाड्यावर ‘मैत्र’ची दिवाळी

By admin | Published: November 10, 2015 11:38 PM2015-11-10T23:38:55+5:302015-11-10T23:38:55+5:30

पालघर जिल्हयातील आवारपाडा या आदिवासी पाड्यांवर मित्र फाऊंडेशनतर्फे दिवाळी साजरी करत आनंद द्विगुणित केला. महत्त्वाचे म्हणजे दिवाळी साजरा करताना आदिवासी

Diwali of 'Friends' on Awarpada Padwa | आवारपाडा पाड्यावर ‘मैत्र’ची दिवाळी

आवारपाडा पाड्यावर ‘मैत्र’ची दिवाळी

Next

मुंबई: पालघर जिल्हयातील आवारपाडा या आदिवासी पाड्यांवर मित्र फाऊंडेशनतर्फे दिवाळी साजरी करत आनंद द्विगुणित केला. महत्त्वाचे म्हणजे दिवाळी साजरा करताना आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी अभिनेते पंकज विष्णू, अभिजित केळकर, अभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंतांनी आदिवासी पाड्यांवर हजेरी लावली.
गावांसह पाड्यांपर्यंत संगणकीकरण झाल्यानंतरच ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न शक्य होईल, हे लक्षात घेत मैत्र फाऊंडेशनने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यंदा आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी करताना आदिवासींपर्यंत संगणक पोहोचवण्यात आले आहे. शिवाय आदिवासी पाड्यांवर संगणक उपलब्ध केल्याने गावकऱ्यांनाही संगणकाचे प्राथमिक धडे देण्यात येत आहे. ‘पहिला दिवा समाजातील शेवटच्या घटकाच्या झोपडीत लावूया, दिवाळी हा सर्वोच्च आनंद या घटकांसोबत साजरा करूया’ या संकल्पनेतून मैत्र फांऊडेशनने चार वर्षांपूर्वी आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी करणे सुरु केल्याचे संस्थेचे अध्यक्ष केशव उपाध्ये यांनी सांगितले.
गेल्या चार वर्षांपासून ही संस्था परिसरात पाणी आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. यंदा संगणकाचे ज्ञान देत आदिवासींना फराळाचा आनंदही दिला. शिवाय आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी होत असतानाच आदिवासींनी तारपा नृत्य केल्याने येथील आनंद आणखीच द्विगुणित झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Diwali of 'Friends' on Awarpada Padwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.