म्हाडाची धारावीवासीयांना दिवाळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 09:42 PM2016-10-26T21:42:39+5:302016-10-26T21:42:39+5:30
म्हाडातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ चा पुनर्विकास केला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत धारावीत उभारण्यात आलेल्या १८ मजली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - म्हाडातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ चा पुनर्विकास केला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत धारावीत उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीत क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सदनिकांचा ताबा दिला जाणार आहे. पथदर्शी इमारतीच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. या माध्यमातून पात्र झोपडीधारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात प्रवेश दिला जाईल. दरम्यान, १८ आॅक्टोबर रोजी क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना चिट्ठी पद्धतीने सोडत काढून सदनिकांचे वितरणपत्र देण्याबरोबरच पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या इमारतीत ३०० चौरस फुटांच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. मे-२०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला.