यंदा १६ दिवसच शाळांना दिवाळीची सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 05:46 AM2018-10-26T05:46:57+5:302018-10-26T05:47:01+5:30

काही दिवसांवर आलेल्या दिवाळीची सगळीकडे तयारी सुरू आहे. मात्र शाळांना यापूर्वी देण्यात येणारी दिवाळीची २१ दिवसांची सुट्टी आता १६ ते १७ दिवसांवर आली आहे.

Diwali holiday for schools this year is 16 days | यंदा १६ दिवसच शाळांना दिवाळीची सुट्टी

यंदा १६ दिवसच शाळांना दिवाळीची सुट्टी

Next

मुंबई : काही दिवसांवर आलेल्या दिवाळीची सगळीकडे तयारी सुरू आहे. मात्र शाळांना यापूर्वी देण्यात येणारी दिवाळीची २१ दिवसांची सुट्टी आता १६ ते १७ दिवसांवर आली आहे. इतर सुट्टी देण्यासाठी दिवाळीची सुट्टी कमी करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे पालक व शिक्षकवर्गात ही नाराजी आहे.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचे अधिकार शाळांना दिल्याने अडचणी निर्माण होत आहेत. शाळा आपापल्या सोयीनुसार सुट्टीचे नियोजन करीत असल्याने राज्यातील शाळांमध्ये सुसूत्रता नसल्याचे निदर्शनास आले असून शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक सत्र
सुरू होण्यापूर्वी त्याचे नियोजन
करावे, अशी मागणी होत आहे.
यंदा जुलै महिन्यात पडलेला पाऊस, मराठा मोर्चा, भारत बंद आदी कारणांमुळे त्या त्या दिवशी
शाळांना सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे ते दिवस भरून काढण्याचे नियोजन करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे मुंबई विभागातील दिवाळीच्या सुट्टी ५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत देण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहे. दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीदरम्यान शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्याचेही काम दिले जाते. त्यामुळे सुट्टीचा कालावधी २५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची मागणी शिक्षक लोकशाही आघाडीचे राजेश पांडया यांनी केली आहे
>या कारणांमुळे सुट्टी झाली कमी?
आरटीई अंतर्गत शासन नियमाप्रमाणे प्राथमिकसाठी २०० दिवस
आणि माध्यमिकसाठी २३० दिवस भरावे लागतात. यासाठी उन्हाळी
किंवा दिवाळीची सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांना सुट्टी द्यावी आणि याचे नियोजन शाळा स्तरावर करावे, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. त्याला शिक्षक लोकशाही आघाडी या संघटनेने विरोध केला आहे.

Web Title: Diwali holiday for schools this year is 16 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.