Join us

मुंबईत ऐन दिवाळीत कचराकोंडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 4:54 AM

मुंबईतील कचरा कमी झाल्याचा दावा करीत महापालिकेने कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या कमी केली. मात्र, अनेक ठिकाणी कचरा वेळेत उचलला जात नसल्याने, मुंबईत ऐन सणासुदीत ठिकठिकाणी कचरा साठून राहत आहेत.

मुंबई : मुंबईतीलकचरा कमी झाल्याचा दावा करीत महापालिकेने कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या कमी केली. मात्र, अनेक ठिकाणी कचरा वेळेत उचलला जात नसल्याने, मुंबईत ऐन सणासुदीत ठिकठिकाणी कचरा साठून राहत आहेत. याचे तीव्र पाडसाद स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी उमटले. कचरा साठून राहिल्यास रोगराई पसरण्याची भीती सदस्यांनी व्यक्त केली.मुंबईत दररोज साडेनऊ हजार मेट्रिक टन कचरा जमा होत होता. मात्र, गेल्या वर्षभरात केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील कचºयाचे प्रमाण सात हजार २०० मेट्रिक टनवर आल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. त्यामुळे कचरा उचलणाºया वाहनांची संख्या कमी करण्यात आली, परंतु वाहनांची संख्या कमी केल्यामुळे कचरा वेळेवर उचलला जात नसल्याच्या तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीच्या बैठकीत या गंभीर समस्येवर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मुद्दाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत प्रशासनाला धारेवर धरले.गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग साचत आहेत. प्रशासनाने कचºयाचे प्रमाण कमी झाल्याचे सांगत, २० टक्के वाहने कमी केली आहेत. यामुळेच कचºयाचा ढीग मुंबईत पडून असल्याचा आरोप सदस्यांनी केला. अ‍ॅन्टॉप हिल परिसरात कचºयाच्या ११ गाड्या कमी केल्यामुळे तीन ट्रक कचरा रस्त्यावर पडून असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.कचºयामुळे मुंबईत आजार पसरेल, अशी भीती शिवसेनेचे मंगेश सातमकर, भाजपाचे विद्यार्थी सिंह यांनी व्यक्त केली. मात्र, या आरोपांचे खंडन करीत मुंबईतून १५ टक्के कचरा कमी झाला आहे. तरीही कचरा उचलला जात नसल्याची तक्रार असल्यास वाहने वाढविण्यात येतील, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले. स्थायी समितीने हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला आहे.वाहनांची संख्या वाढविणारकचरा भूमीवर नेण्यात येणाºया कचºयाचे वजन केल्यानंतर कचºयाचे प्रमाण पूर्वीपेक्षा १५ टक्के कमी झाल्याचे समोर आले आहे. एफ उत्तर म्हणजे परळ आणि एम पूर्व आणि पश्चिम म्हणजे मानखुर्द, गोवंडीमध्ये कचºयाची वाहने वाढविण्यात आली आहेत, असे उपायुक्त विश्वास शंकरावर यांनी स्थायी समितीमध्ये स्पष्ट केले.आणखी ७० वाहने कमी करण्याचे महानगरपालिकेचे ‘लक्ष्य’मुंबईत दररोज साडेनऊ हजार मेट्रिक टन कचरा जमा होत होता. गेल्या वर्षभरात हे प्रमाण सात हजार २०० मेट्रिक टनवर आणण्यात आले आहे. यामुळे कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाºया वाहनांपैकी १२० वाहने कमी करण्यात आली आहेत.सध्या महापालिकेकडे कचरा वाहतुकीसाठी २११८ वाहने आहेत. आणखी ७० वाहने कमी करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे.मुंबईतून १५ टक्के कचरा कमी झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

टॅग्स :कचराकचरा प्रश्नमुंबई