लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकार, विकासकांकडून सवलतींचा वर्षाव होत असल्याने मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्री व्यवहारांत लक्षणीय वाढ झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेवढ्या घरांची विक्री झाली होती तेवढे व्यवहार यंदा महिन्याच्या पहिल्या १७ दिवसांतच पूर्ण झाले. गतवर्षीच्या तुनलेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये दुप्पट व्यवहारांची नोंद होईल, अशी दाट शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
गेल्या १२ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांचा विक्रम यंदा मोडला. गेल्या महिन्यात तब्बल ७,९२६ व्यवहारांची नोंद झाली. गेल्या नोव्हेंबरमध्ये ५,५७२ व्यवहारांमधून सरकारला ४२८ कोटींचा महसूल मिळाला होता. यंदा महिन्यातील पहिल्या १७ दिवसांतच ५,५६८ व्यवहार नोंदणीकृत झाले. महिनाअखेरीस एकूण व्यवहार ९ हजारांपर्यंत झेपावतील आणि आजवरचा एका महिन्यातील सर्वाधिक व्यवहारांच्या नोंदणीचा विक्रम होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मुद्रांक शुल्कातील सवलतींमुळे या महिन्यातील सरकारी महसूल जेमतेम ३०० कोटींपर्यंतच पोहोचेल अशी शक्यता आहे.
‘ब्लॅक’च्या व्यवहारांना वाव?n केंद्र सरकारने रेडी रेकनर, ॲग्रिमेंट व्हॅल्यू यांच्यातील २० टक्क्यांपर्यंतची तफावत आयकरमुक्त केली. त्यामुळे घरांच्या किमती कमी होऊन व्यवहार वाढतील. n सरकारी सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणि आर्थिक अरिष्ट दूर करण्यासाठी विकासक घरांचे करार कमी किमतीत करतील आणि उर्वरित रक्कम ‘ब्लॅक मनी’च्या माध्यमातून स्वीकारतील, अशी माहिती काही विकासकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
रोज ४७५ कोटींच्या घरांची विक्रीमुंबई शहरात दररोज सरासरी ४७५ कोटी रुपयांच्या घरांची विक्री होत असून गेल्या १७ दिवसांत ८१०० कोटी रुपये किमतीच्या मालमत्तांचे व्यवहार झाले. गेल्या महिन्यात दररोज सरासरी ३७४ कोटी किमतीच्या घरांची विक्री झाली होती. रोज १०० कोटींच्या अतिरिक्त व्यवहारांमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जास्तीत जास्त नोंदणीचा प्रयत्नगेल्या महिन्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर नोंदणी झालेल्या घरांचे रजिस्ट्रेशन सध्या होत आहे. दिवाळीच्या मुहूर्तांवरील घरांची नोंदणीही येत्या महिन्याभरात होईल. राज्य सरकारने दिलेली मुद्रांक शुल्काची तीन टक्के सवलत डिसेंबर अखेरपर्यंतच आहे. त्यापूर्वी जास्तीतजास्त व्यवहार नोंदविण्याचा प्रयत्न असेल.