कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही; उद्धव ठाकरे यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 12:54 AM2020-11-12T00:54:20+5:302020-11-12T07:05:03+5:30

स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे, हे आपले प्राधान्य असले पाहिजे.

Diwali is not understood to corona; CM Uddhav Thackeray's appeal to the citizens of the state | कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही; उद्धव ठाकरे यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन

कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही; उद्धव ठाकरे यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन

Next

मुंबई : दिवाळीचा आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. स्वत: देखील केवळ सोशल मीडिया, ई मेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे, हे आपले प्राधान्य असले पाहिजे. हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी लढताहेत, सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत. हे कृपया विसरू नका, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Web Title: Diwali is not understood to corona; CM Uddhav Thackeray's appeal to the citizens of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.