मुंबई : दिवाळी सुरू होण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असताना, रविवारी मुंबईकरांनी रविवारची सुट्टी सार्थकी लावत खरेदीचा मुहूर्त शोधला. रविवारी सकाळपासून शहर-उपनगरातील बाजारपेठांत ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. अगदी कपड्यांपासून कंदील, दिवे, फटाके ते थेट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीला ग्राहकांनी पसंती दर्शविली. दिवाळीनिमित्त मॉल्सपासून सर्वच ठिकाणी सवलत आणि सेल असल्यामुळे याकडे ग्राहक अधिकाधिक आकर्षित होत असल्याचे दिसून आले. दादर, परळ, लालबाग, क्रॉफर्ड मार्केट, धारावी, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड अशा बाजारपेठांत ग्राहकांनी गर्दी केली, शिवाय शहर-उपनगरातील मॉल्समध्येही रविवारी ग्राहकांचा अधिक ओढा होता.कंदिलाच्या खरेदीसाठी ग्राहकांची क्रॉफर्ड मार्केट, दादर आणि माहीमच्या कंदील गल्लीत गर्दी दिसून आली, तसेच दिवाळीनिमित्त बाजारात रंगीबेरंगी रांगोळ्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. पाकीटबंद रांगोळ्यांना मोठी मागणी आहे. रांगोळ्यांसोबतचलक्ष्मी पूजनासाठी लागणाऱ्या लक्ष्मीदेवींच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. प्रामुख्याने नगरमध्ये पश्चिम बंगालसह राज्याच्याअनेक भागांतून लक्ष्मीमूर्ती येत असतात. त्याचबरोबर नगर शहरातदेखील प्रमुख चार ते पाच कारखान्यांमध्ये मूर्ती तयार केल्या जातात. वर्षभर या कारखान्यांत मूर्ती तयार केल्या जातात. सध्या बाजारात दाखल झालेल्या मूर्ती महाग असल्या, तरी लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येपर्यंत भाव आणखी कमी होतील, असा अंदाज दादर येथील विक्रेत्यांनी मांडला आहे. बाजारात शंभर रुपयांपासून ते तीनशे रुपयांपर्यंत किमतीपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत.तसेच दिवाळीनिमित्त नवीन कपडे खरेदी करण्यासाठी कापडबाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. कापडबाजारातील विविध दुकानांमध्ये विविध योजना सुरू असल्यामुळे ग्राहक योजना सुरू असलेल्या दुकानांकडे वळत आहेत. विविध ब्रँडेड कंपन्याच्या दुकानांवर सवलत असल्यामुळे ग्राहकांचा ओढा या दुकानाकडे वाढलेला आहे. वाहन खरेदी, सराफांकडे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीकडेही ग्राहकांचा चांगलाच कल आहे. दरम्यान, या वर्षी नोटाबंदी जीएसटीमुळे काही प्रमाणात दिवाळीच्या खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता बाजारातून व्यक्त होत आहे, पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असाही काही व्यापाºयांचा अंदाज आहे.खरेदीसाठी निघालेल्या प्रवाशांचे ‘मेगा’हालदिवाळीनिमित्त खरेदीसाठी शेवटच्या रविवारी निघालेल्या मुंबईकरांचे रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे चांगलेच हाल झाले. मध्य मार्गावर ब्लॉक असल्यामुळे सुमारे २० मिनिटांहून अधिक काळ लोकल विलंबाने धावत होत्या. यामुळे दादर स्थानकासह मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली होती.सोमवारी ५ नोव्हेंबरला धनत्रयोदशी असल्यामुळे बहुतांशी मुंबईकरांनी रविवारीच दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी मार्केटकडे कूच केली. हार्बर मार्गावर ब्लॉक नसल्यामुळे हार्बरवासीयांना दिलासा मिळाला. मात्र मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर ५ तासांचा ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. तर दादर पादचारी पुलावर ऐन दुपारी मोठी प्रवासी गर्दी झाल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाची पुलावरील गर्दी नियोजनासाठी एकच तारांबळ उडाली होती. रविवारचे वेळापत्रक लागू केल्याने आधीच लोकल फेºयांची संख्या कमी होती. तर ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉकमुळे दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद होती.आॅनलाइन मार्केट तेजीतघाऊक आणि किरकोळ बाजारपेठेप्रमाणेच आॅनलाइन कंपन्यांचे मार्केटही सध्या भलतेच तेजीत आहे. बºयाच योजना, सवलती आणि घरपोच सेवेमुळे या क्षेत्राचा विस्तार दिवसागणिक वाढत चालला आहे. सण-उत्सवाच्या काळांत आॅनलाइन बाजारपेठेची उलाढाल कोट्यवधींच्या घरात जाते.
दिवाळीपूर्वीच्या ‘खरेदीवारी’ झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 4:28 AM