Join us

यंदा खऱ्या अर्थाने सराफा बाजारात दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 6:48 AM

नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतर सराफा बाजाराला ‘अच्छे दिन’ आले आहेत. नोटाबंदी वेळी ९० टक्के, तर नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यावरही सराफा बाजाराला नेहमीच्या तुलनेत १० टक्के नुकसान सहन करावे लागले होते.

- चेतन ननावरेमुंबई  - नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतर सराफा बाजाराला ‘अच्छे दिन’ आले आहेत. नोटाबंदी वेळी ९० टक्के, तर नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यावरही सराफा बाजाराला नेहमीच्या तुलनेत १० टक्के नुकसान सहन करावे लागले होते. मात्र, यंदाच्या दसरा व धनत्रयोदशीला खºया अर्थाने सराफा बाजाराने गती घेतल्याची प्रतिक्रिया मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली आहे.नेहमीच्या तुलनेत यंदा खºया अर्थाने सराफा बाजार दिवाळी सण साजरा करत असल्याचे जैन यांनी सांगितले. जैन म्हणाले की, यंदा सराफा बाजाराने सरासरी व्यवसायाच्या ११० ते १२० टक्के व्यवसाय केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचे विश्लेषण करणार नाही. मात्र त्याचा परिणाम या दसºयापर्यंत सराफा बाजाराला सहन करावा लागला. बँकेत जमा झालेला पैसा गुंतवणूक स्वरूपात सराफा बाजारात आत्ता कुठे येऊ लागला आहे. नोटाबंदीच्या काळात लोकांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीत सोनेखरेदी तर दूरच होते. गतवर्षी नोटाबंदीची झळ काही प्रमाणात शिल्लक असताना, नव्याने आलेल्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीमुळे सराफा बाजाराला १० टक्के फटका बसला. केंद्र शासनाने लादलेल्या जाचक अटी दूर झाल्यानंतर, हळूहळू बाजाराने गती घेतली. यंदा दसरा, धनत्रयोदशीला सराफा बाजाराने पुन्हा गगनभरारी घेण्यास सुरुवात केली आहे.मजूर पुन्हा बाजारात परतलेगेल्या दोन वर्षांत ज्या मजुरांनी रोजगार गमावला होता, तो आत्ता कुठे पुन्हा निर्माण होऊ लागल्याचा दावा सराफा करत आहेत. हजारो कामगारांना नोटाबंदीच्या काळात मायदेशी परतावे लागले होते. तेच कामगार आता पुन्हा झवेरी बाजारासह महाराष्ट्रातील सराफा पेढ्यांवर ओव्हरटाइम करताना दिसत असल्याचे मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे. ‘सबर का फल मिठा होता हैं’ या म्हणीचा प्रत्यय सराफा बाजाराला येतोय, अशा शब्दांत सराफा बाजाराचे तज्ज्ञ नोटाबंदीचे वर्णन करत आहेत.

टॅग्स :सोनंदिवाळी