ऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:07 AM2021-05-18T04:07:07+5:302021-05-18T04:07:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वत्र कठोर निर्बंध आहेत. यामुळे गर्दी टाळण्यासाठी मोठे सण - उत्सव ...

DJs in commercial difficulty due to lack of demand during Ain business | ऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत

ऐन व्यवसायाच्या काळात मागणी नसल्याने डीजे व्यावसायिक अडचणीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वत्र कठोर निर्बंध आहेत. यामुळे गर्दी टाळण्यासाठी मोठे सण - उत्सव तसेच लग्न समारंभांवरही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. परिणामी अनेकांनी लग्न सोहळे व इतर मोठे समारंभ रद्द केले आहेत. उन्हाळ्याच्या काळात लग्न तसेच इतर समारंभ मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. यामुळे दरवर्षी डिजे साऊंड सिस्टिमला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, यंदा सगळीकडे बंदची परिस्थिती असल्याने डीजे व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मागील वर्षभरापासून कमाई न झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला आहे. या काळात अनेक डीजे व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद केला, तर काहीजण अद्याप लॉकडाऊन संपेल या आशेवर आहेत. मात्र दिवसेंदिवस लॉकडाऊन वाढतच चालल्याने त्यांच्या अडचणीत भर पडत चालली आहे.

* उदरनिर्वाहाचा प्रश्न

मागील वर्षभरापासून गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, नाताळ यांसारखे महत्त्वाचे सण अत्यंत साधेपणाने साजरे झाले. तसेच लग्न समारंभ, स्नेह संमेलन व इतर कार्यक्रमांवरही बंदी होती. यामुळे साऊंड सिस्टिम स्पीकर धूळखात पडले आहेत. मागील वर्षभरात एकही रुपयाची कमाई न झाल्याने आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

संदीप मोझे,

डीजे व्यावसायिक, चेंबूर

* अडचणींकडे कोणीच लक्ष देत नाही.

मोठे समारंभ रद्द झाल्याने त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर सर्व व्यावसायिकांचे मरण झाले आहे. आमच्या अडचणींकडे कोणीच लक्ष देत नाही. कामगारांचे पगार, जागेचे भाडे, तसेच साऊंड सिस्टिम साहित्याची डागडुजी यांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. आता बचतदेखील संपल्याने हा व्यवसायच बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे.

ऑग्डन डिसुझा, डीजे व्यावसायिक, घाटकोपर

......................................................

Web Title: DJs in commercial difficulty due to lack of demand during Ain business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.