डी.एन.नगर, वडाळा मेट्रो मार्गी, पावसाळ्यादरम्यान तांत्रिक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:22 AM2018-06-19T02:22:08+5:302018-06-19T02:22:08+5:30
मेट्रोचे जाळे मुंबईत सर्वदूर पसणार आहे. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मेट्रो १ प्रकल्पानंतर मेट्रो मार्ग - २ अ, ब, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १० चे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अजेंड्यावर आहे.
मुंबई : मेट्रोचे जाळे मुंबईत सर्वदूर पसणार आहे. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मेट्रो १ प्रकल्पानंतर मेट्रो मार्ग - २ अ, ब, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १० चे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अजेंड्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो मार्ग-२ ब आणि वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग-४ या मेट्रो कामास सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई शहर आणि उपनगरात मेट्रो प्रकल्प उभारले जात आहेत. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या प्राधिकरणाच्या पहिल्या मेट्रो प्रकल्पाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर, एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशाला जोडण्यासाठी अनेक मेट्रो प्रकल्प हाती घेतले आहेत.
या मेट्रो प्रकल्पांपैकी डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो मार्ग-२ ब आणि वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग-४ हे दोन महत्त्वाचे प्रकल्प असून, त्याच्या कामास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. पावसाळ्यादरम्यान सर्वेक्षण, भौगोलिक-तांत्रिक तपासणी, सेवा वाहिन्या शोधणे, टेस्टिंग पाइलिंग इत्यादी प्राथमिक कामे करण्यात येतील. येथे सुरक्षेसाठी प्राधिकरणाद्वारे बॅरिकेडिंग उभारण्यात येतील. हे काम सुरळीत पार पाडण्यासाठी प्राधिकरणाने मुंबईकरांना मदतीसाठी आवाहन केले आहे. मेट्रोंमुळे मुंबईचा वेग वाढून गर्दीचा प्रवास, वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी अपेक्षा आहे.मुंबई आणि ठाणे परिसरात सहज, तसेच वेगवान प्रवास करता यावा, या उद्देशाने विविध मेट्रो प्रकल्प राबविले जात आहेत. त्यासाठी करण्यात येत असलेल्या बॅरिकेडिंगसंदर्भात लोकांच्या काही सूचना किंवा प्रश्न असल्यास, ०२२-२६५९४१७६ आणि ०२२-२६५९१२४१ येथे नोंदविण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. दरम्यान, पश्चिम उपनगरात मेट्रोच्या कामासाठी खणलेल्या खड्ड्यात पडून चिमुरडीचे प्राण गेले होते. या घटनेनंतर प्राधिकरणावर टीका झाली. मात्र, प्राधिकरणाने जबाबदारी झटकत मुंबईकरांनीच आपली काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते.
मुंबई आणि ठाणे परिसरात सहज, तसेच वेगवान प्रवास करता यावा, या उद्देशाने विविध मेट्रो प्रकल्प राबविले जात आहेत. त्यासाठी करण्यात येत असलेल्या बॅरिकेडिंगसंदर्भात लोकांच्या काही सूचना किंवा प्रश्न असल्यास, ०२२-२६५९४१७६ आणि
०२२-२६५९१२४१ या क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.
दरम्यान, पश्चिम उपनगरात मेट्रोच्या कामासाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका चिमुरडीचे प्राण गेले होते. या घटनेनंतर प्राधिकरणावर जोरदार टीका झाली होती. मात्र, प्राधिकरणाने जबाबदारी झटकत उलटपक्षी मुंबईकरांनीच आपली काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते. त्यामुळे मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
>मेट्रो - २ ब
स्थानके : एसीक नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खिरा नगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे मेट्रो, एमएमआरडीए आॅफीस, इन्कम टॅक्स आॅफीस, आयएलएफएस, एमटीएनएल मेट्रो, एस.जी. बर्वे मार्ग, कुर्ला टर्मिनस, कुर्ला पूर्व द्रुतगती महामार्ग आणि चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द, मंडाले
>मेट्रो - ४
स्थानके : भक्ती पार्क, वडाळा टी. टी., आणिक नगर बस डेपो, सुमननगर, सिद्धार्थनगर, सिद्धार्थ कॉलनी, अमर महल जंक्शन, गरोडियानगर, पंतनगर, लक्ष्मीनगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो आणि सूर्यानगर, गांधीनगर, नेवल हाउसिंग, भांडुप महापालिका, भांडुप मेट्रो, शांघ्रीला आणि सोनापूर, मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका, तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजीनि वाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली
>अशी धावणार मेट्रो
मेट्रो-२ अ : दहिसर ते डी. एन. नगर
मेट्रो-२ ब : डी. एन. नगर ते मंडाला
मेट्रो-३ : कुलाबा-वांद्रे-सीप्झ
मेट्रो-४ : वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली
मेट्रो-५ : ठाणे-भिवंडी-कल्याण
मेट्रो-६ : स्वामी समर्थनगर-जेव्हीएलआर-सीप्झ-विक्रोळी
मेट्रो-७ : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व
मेट्रो-८ : वडाळा ते जीपीओ
मेट्रो-९ : अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व
मेट्रो-१० : दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर
>काही महत्त्वाचे मार्ग
मेट्रो १ : घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा
अंतर - ११. कि. मी. स्थानके - १२
पूर्णपणे जमिनीवर असलेला हा मार्ग आहे.