लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिना भरभरून पाऊस देत असून, या पावसामुळे मुंबईसह राज्यभरातील धबधब्यांचे पिकनिक स्पॉट व ट्रेक ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. विशेषत: मुंबईपासून जवळ असणारे धबधबे, किल्ल्यांवर ट्रेकसाठी भर पावसात जाणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. मात्र, असे ट्रेक, सहली करताना जीवावर काही बेतणार नाही ना ? याची काळजी घेत सर्व सुरक्षेसह मान्सूनचा आनंद घ्या, असे आवाहन ज्येष्ठ गिर्यारोहकांनी केले आहे.
आयत्यावेळी ट्रेकमध्ये बदल केला तर त्याबद्दल संबंधितांना कळवा. ट्रेक संपल्यावर सगळे घरी पोहोचले आहेत याची खात्री करा. सोबत जास्तीचे कोरडे पदार्थ ठेवावे. आपत्कालीन स्थितीत त्याचा उपयोग होतो. काही दुर्घटना घडल्यास ७६२०२३०२३१ या २४x७ हेल्पलाईन नंबरवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा. - उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ
ट्रेकला जाण्यापूर्वी...n ओळखीच्या व अनुभवी ग्रुपसोबत ट्रेकला जावे.n ट्रेकमधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल एवढीच असावी.n ग्रुपकडे औषधोपचार पेटी असावी.n ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर / ग्रुप यांची माहिती घरी / जवळच्या व्यक्तीस द्यावी.ट्रेकला जाताना...n ट्रेक एक दिवसाचा असला तरी सोबत चांगली टॉर्च ठेवावीn आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या (गाईड) सोबत घ्यावा.n पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे.n धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी.