धरणांची कामे युद्धपातळीवर करा!

By admin | Published: June 25, 2015 11:08 PM2015-06-25T23:08:52+5:302015-06-25T23:08:52+5:30

तालुक्यातील काळ जलविद्युत प्रकल्पासह रखडलेल्या कोथेरी, नागेश्वरी आणि महाड नगरपालिकेच्या कुर्ला व कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीबाबत मंत्रालयात

Do the dams at war-time! | धरणांची कामे युद्धपातळीवर करा!

धरणांची कामे युद्धपातळीवर करा!

Next

महाड : तालुक्यातील काळ जलविद्युत प्रकल्पासह रखडलेल्या कोथेरी, नागेश्वरी आणि महाड नगरपालिकेच्या कुर्ला व कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीबाबत मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम करून धरणांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाड तालुक्यातील रखडलेल्या धरणांचा प्रश्न गांभीर्याने हाताळून मुंबई प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. प्रवीण दरेकर यांनी याबाबतचा पाठपुरावा करीत जलसंपदामंत्री यांना याप्रकरणी गंभीर लक्ष घालण्याची विनंती केली असता मंत्रालयात मंगळवारी मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संबंधित खात्यांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विषयात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रथम दरेकर यांनी १९९८ साली काळ-कुंभे जलविद्युत प्रकल्प मंजूर झाला असून त्यावेळी त्याचा ९९ कोटी एवढा खर्च होता. मात्र रेंगाळलेल्या ठेकेदारांच्या कामामुळे तसेच पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे या धरणाचे काम रखडले आहे.
२००४, २००९, २०१० अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या कामाला सुधारित मंजुऱ्या मिळून ७४० कोटींच्या घरात खर्च झाला आहे. अजूनही या धरणाला जवळपास १२०० कोटी खर्च होणार असल्याचे त्यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. या जलविद्युत प्रकल्पातून २५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे.
महाड तालुक्यातील निम्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या विषयाची गंभीर दखल घेत मंत्री महोदयांनी जलविद्युत प्रकल्पबाधित निजामपूर, बावळा, सांदोशी व आमडोशी या गावांच्या पुनर्वसनासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांना सूचना देऊन ग्रामस्थांच्या इच्छेप्रमाणे माणगांव तालुक्यातील नाणोरे या ठिकाणची जमीन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
तसेच पुनर्वसनाच्या कामाला कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले. ज्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनी २००९ मध्ये संपादित केल्या त्यांना २०१५ प्रमाणे पाच पट मोबदला मिळावा, अशी मागणी दरेकर यांनी केली. (वार्ताहर)

Web Title: Do the dams at war-time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.