डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी नियमावली आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:24+5:302021-06-11T04:06:24+5:30
उच्च न्यायलयाने राज्य सरकारकडून मागितली माहिती डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी नियमावली आहे का? उच्च न्यायलयाने राज्य सरकारकडून मागितली ...
उच्च न्यायलयाने राज्य सरकारकडून मागितली माहिती
डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी नियमावली आहे का?
उच्च न्यायलयाने राज्य सरकारकडून मागितली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चोवीस तास कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांच्या हल्ल्यापासून संरक्षण देण्यासाठी काय नियमावली आहे, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे गुरुवारी केली.
डॉक्टरांच्या संरक्षणासाठी काय पावले उचलण्यात आली आहेत, याची माहिती द्या. पुढील सुनावणीला आम्ही यासंदर्भात आदेश देऊ, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली.
कोरोनाच्या गैरव्यवस्थापनाबाबत करण्यात आलेल्या अनेक जनहित याचिकांवर गुरुवारी सुनावणी होती. सुनावणीदरम्यान, ॲड. राजेश इनामदार यांनी न्यायालयाला सांगितले की, कोरोनावर उपचार करणाऱ्या अनेक डॉक्टरांना पोलिसांकडून नोटिसा मिळत आहे. कारण रुग्णांना मिळणाऱ्या उपचाराबाबत त्यांचे नातेवाईक नाखुश आहेत किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे ते पोलिसांकडे तक्रार करतात. त्यामुळे पोलीस डॉक्टरांना नोटिसा बजावत आहेत. याची विपरीत प्रतिक्रिया उमटायला नको.
डॉक्टर चोवीस तास काम करत आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त तणाव आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकारकडे याबाबत काही नियमावली आहे का?, असे म्हणत उच्च न्यायालयाने याप्रकरणी महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना साहाय्य करण्याचे निर्देश दिले.