कुष्ठरोग व क्षयरोग नियंत्रणासाठी घरोघरी जाऊन करणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 01:40 AM2019-09-18T01:40:39+5:302019-09-18T01:40:44+5:30

‘संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रीय क्षयरोग शोध मोहिम व असंसर्गजन्य प्रतिबंध जागरुकता अभियान’ बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

Do home-to-house inspections for leprosy and tuberculosis control | कुष्ठरोग व क्षयरोग नियंत्रणासाठी घरोघरी जाऊन करणार तपासणी

कुष्ठरोग व क्षयरोग नियंत्रणासाठी घरोघरी जाऊन करणार तपासणी

Next

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून ‘संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रीय क्षयरोग शोध मोहिम व असंसर्गजन्य प्रतिबंध जागरुकता अभियान’ बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत २३ सप्टेंबर पासून ते ९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीदरम्यान महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी व त्या सदृश्य परिसरात राहणाऱ्या सुमारे ४० लाख नागारिकांची कुष्ठरोग, क्षयरोग यासह उच्चरक्तदाब, मधुमेह व कर्करोग (मुख, गर्भाशय व स्तन) या असंसर्गजन्य रोगांबाबतही प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.
या अभियानामध्ये तब्बल २ हजार ७०५ चमूंद्वारे २४ विभागांमधील नागरिकांची तपासणी त्यांच्या घरी जाऊन करण्यात येणार आहे. या प्रत्येक चमूमध्ये दोन सदस्यांचा समावेश असणार आहे. या अभियानांतर्गत साधारणपणे ४० लाख व्यक्तींची तपासणी होणार आहे. तपासणीदरम्यान आढळून येणाºया संशयित रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य केंद्रात व दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. तर दवाखान्यामध्ये महापालिकेच्या आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांद्वारे कुष्ठरोग, क्षयरोग वा असंसर्गजन्य रोगाचे निदान केले जाणार आहे.
>कुष्ठरोग
समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे.
नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसगार्ची साखळी खंडित करुन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे.
नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण दर १० लाख लोकसंख्येमागे १ पेक्षा कमी करणे.
समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे व कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे.
>क्षयरोग
क्षयरोगाच्या निदाना अभावी अद्याप औषधोपचारापासून वंचित असणाºया क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करणे.
मोहिमेदरम्यान प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेटी देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाºया व्यक्ती शोधणे.
संशयित क्षयरुग्णांचे थुंकीचे नमुने व क्ष किरण तपासणीसह आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करुन क्षयरोगाचे निदान करणे व औषधोपचार सुरु करणे.
समाजात क्षयरोगाविषयी जनजागृती करणे.
>असंसर्गजन्य रोग
असंसर्गजन्य रोगांबद्दल जनजागृती करणे
समाजातील वय वर्षे ३० व अधिक वयोगटातील लोकांची तपासणी करुन उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग
(मुख, गर्भाशय व स्तन) या रोगांबाबत सर्वेक्षण करणे.
>तपासणीस सहकार्य करावे
या तपासणी दरम्यान संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांना महापालिकेच्या आरोग्य केंद्रात व दवाखान्यात तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाची चमू तपासणीसाठी घरी आल्यास त्यांना यथायोग्य सहकार्य करावे
- डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी
>कुर्ला ‘आजारी’
२०१८ साली मुंबईतील रुग्णालय व दवाखान्यांमध्ये नोंद झालेल्या संवेदनशील आजारांत एल विभागात म्हणजेच कुर्ला येथे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात कुर्ला येथे अतिसाराच्या ११ हजार ५०५ , क्षयरोगाच्या ७६८ तर मधुमेहाच्या १ हजार ८९३१ रुग्णांची नोंद झाली.
>गोरेगावात सरकारी दवाखान्यांची संख्या अत्यल्प
पी/ दक्षिण या विभागात ४ लाख ६३ हजार ५०७ लोकांसाठी केवळ एक सरकारी आणि दोन दवाखाने आहेत. यातील ५४ टक्के नागरिक खासगी आरोग्य सेवेचा लाभ घेतात. तर एल, जी/दक्षिण आणि ई या विभागात अनुक्रमे ६०, ५७ आणि ६४ टक्के नागरिक सार्वजनिक आरोग्य सेवेचा विनियोग करतात.

Web Title: Do home-to-house inspections for leprosy and tuberculosis control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.