राज्य सरकारकडून ९ जूनपर्यंत कागदपत्रे मागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:05 AM2021-05-27T04:05:23+5:302021-05-27T04:05:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भ्रष्टाचार, पोलीस बदल्या व बढत्यांप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या तक्रारीसंबंधीची कागदपत्रे ९ ...

Do not ask for documents from the state government till June 9 | राज्य सरकारकडून ९ जूनपर्यंत कागदपत्रे मागणार नाही

राज्य सरकारकडून ९ जूनपर्यंत कागदपत्रे मागणार नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भ्रष्टाचार, पोलीस बदल्या व बढत्यांप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या तक्रारीसंबंधीची कागदपत्रे ९ जूनपर्यंत राज्य सरकारकडून मागणार नाही, असे आश्वासन सीबीआयने उच्च न्यायालयाला बुधवारी दिले. सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी हे आश्वासन न्या. एस.जे. काथावाला व न्या. एस.पी. तावडे यांच्या खंडपीठाला दिले.

भ्रष्टाचाराप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने २१ जून रोजी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील दोन परिच्छेदांवर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होती. सुनावणीदरम्यान एस. व्ही. राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, सीबीआय चौकशीचा आदेश देणाऱ्या मूळ खंडपीठापुढेच (मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांचे खंडपीठ) राज्य सरकारच्या या याचिकेवर सुनावणी घेण्यात यावी. न्यायालयानेही आपल्याला याबाबत हरकत नसल्याचे म्हटले. मात्र, तोपर्यंत सीबीआयने राज्य सरकारकडून कागदपत्रे मागू नयेत, असे आश्वासन सीबीआयने द्यावे, असे खंडपीठाने म्हटले.

या याचिकेवरील सुनावणी अन्य खंडपीठ घेईपर्यंत आम्ही महाराष्ट्र सरकारकडून कागदपत्रे मागणार नाहीत, हे आश्वासन केवळ कागदपत्रांसंदर्भात आहे. तपासासंदर्भात नाही, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने सीबीआयचे म्हणणे मान्य करत उच्च न्यायालयाच्या निबंधकांना ही याचिका मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले.

काय आहे प्रकरण

या परिच्छेदात नमूद केलेल्या बाबींवर सीबीआयने तपास करू नये. उच्च न्यायालयाने ५ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार तपासणी करता सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढविली आहे. सीबीआय राज्य सरकारच्या प्रशासकीय कामांची चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वादग्रस्त परिच्छेदांमध्ये सचिन वाझे यांना पोलीस सेवेत पुन्हा रुजू केल्याबाबत नमूद केले आहे, तर दुसऱ्या परिच्छेदात पोलीस बढत्या व बदल्यांबाबत उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: Do not ask for documents from the state government till June 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.