Join us

आजीसारखे वागू नये, हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला झापलं

By admin | Published: June 13, 2016 4:57 PM

मुंबई हायकोर्टाने आपला ऐतिहासिक निर्णय सुचवला. यावेळी मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला चांगलेच झापले. सेन्सार बोर्डाने ने चित्रपटाला ८९ कट सुनावल्यानंतर हा वाद सुरु झाला होता.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १३ -  'उडता पंजाब'वर सेन्सार बोर्डाने अक्षेपाचा घातल्यानंतर हा वाद न्यायालयात गेल्यावर त्याच्या सुनावणी दरम्यान आज मुंबई हायकोर्टाने आपला ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. यामध्ये उडता पंजाबमध्ये फक्त एक कट आणि पुढील ४८ तासात नवे प्रमाणपत्र गेण्याचा निरणय दिला गेला. यावेळी मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला चांगलेच झापले.  सेन्सार बोर्डाने ने चित्रपटाला ८९ कट सुनावल्यानंतर हा वाद सुरु झाला होता.

यावर मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला चांगलचं सुनवलं, सेन्सॉर बोर्डाने आजीसारखं वागू नये. चित्रपटातील शिव्यांबाबतीत बोलायचं झालं तर, सुजाण नागरिक चित्रपट पाहून शिव्या देतील, असे समजण्याचे कारण नाही. 'उडता पंजाब' मध्ये पंजाब राज्याला वाईट पद्धतीने दाखवल्याचे किंवा त्यात देशाच्या अखंडता किंवा सार्वभौमत्वाला धोका पोचवणारे काही असल्याचे आम्हाला वाटत नाही. 

आज न्यायालयाने फक्त एका कटसहित हा चित्रपट रिलीज करा असं सांगितलं आहे. चित्रपटात शाहिद कपूर लोकांसमोर लघुशंका करतानाचा सीन कट करण्यास सांगण्यात आलं आहे. ही सीन गरजेचा आहे असं वाटत नसल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. पंजाब हरितक्रांती झालेली जमीन आहे, शूर सैनिक येथे जन्माला आलेत, फक्त एका वाक्याने प्रतिमेवर परिणाम होणार नाही