अपयशाचे खापर जनतेच्या माथी मारू नका - मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 04:47 AM2018-10-26T04:47:49+5:302018-10-26T04:47:59+5:30

राज्यात जलयुक्त शिवार योजना अशास्त्रीय पद्धतीने राबवण्यात आली.

Do not blame the people for failure - Munde | अपयशाचे खापर जनतेच्या माथी मारू नका - मुंडे

अपयशाचे खापर जनतेच्या माथी मारू नका - मुंडे

googlenewsNext

मुंबई : राज्यात जलयुक्त शिवार योजना अशास्त्रीय पद्धतीने राबवण्यात आली. कामांची निवड ठेकेदारांच्या सोयीनुसार करण्यात आल्याने सुमार दर्जाची कामे झाली आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
या योजनेमुळे भूजल पातळी वाढली आहे. तेव्हा विरोधकांनी दिशाभूल करू नये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला आहे. त्यावर मुंडे म्हणाले, जलतज्ज्ञ एच. एम. देसरडा, राजेंद्रसिंह यांनीही आक्षेप नोंदवले आहेत. २५२ तालुक्यातील १४ हजार गावांमध्ये भूजलपातळी १ मीटरपेक्षा खाली गेली आहे. हे जलयुक्त शिवार योजनेचे अपयश आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्याचे खापर जनतेच्या माथी मारू नये, असे मुंडे म्हणाले. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राने लागू केलेल्या संहितेतील निकषांची सांगड घालणं इतकं क्लिष्ट आहेत की प्रत्यक्ष आर्यभट्ट आले तरी त्यांनाही ते शक्य नाही असेही ते म्हणाले.

Web Title: Do not blame the people for failure - Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.