बुलेट ट्रेन नको, लोकल सुधारा! सोशल मीडियातून मुंबईकरांनी व्यक्त केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 04:19 AM2017-09-30T04:19:10+5:302017-09-30T04:19:31+5:30

दुर्घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच दुर्घटनेचे व्हिडीओ, फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर ही दुर्दैवी घटना ट्रेंडिंगमध्ये होती.

Do not bullet train, local improve! Mumbaikars expressed their anger over social media | बुलेट ट्रेन नको, लोकल सुधारा! सोशल मीडियातून मुंबईकरांनी व्यक्त केला संताप

बुलेट ट्रेन नको, लोकल सुधारा! सोशल मीडियातून मुंबईकरांनी व्यक्त केला संताप

googlenewsNext

मुंबई : एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. ‘बुलेट ट्रेन नको, लोकलमध्ये सुधारणा करा’, ‘कोट्यवधींची बुलेट ट्रेन हवी कुणाला, साधी एका पुलाची दुरुस्ती जमत नाही’, ‘दुर्घटना नव्हे हत्याकांड’ असे एक ना अनेक मेसेज फेसबुक,  ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप अशा सर्वच सोशल मीडियावर व्हायरल करत मुंबईकरांनी आपला संताप व्यक्त केला.
दुर्घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच दुर्घटनेचे व्हिडीओ, फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर ही दुर्दैवी घटना ट्रेंडिंगमध्ये होती. रेल्वेच्या विकासासाठी करण्यात आलेल्या योजनांसह बुलेट ट्रेनविषयी मुंबईकरांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या. बºयाच नेटिझन्सनी अरबी समुद्रात होणारे भव्य शिवस्मारक हे आपले प्राधान्य आहे की, एल्फिन्स्टनसारख्या पुलांची दुरुती व डागडुजी, असा सवाल उपस्थित करीत सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. जितेंद्र आव्हाड, नीतेश राणे, नवाब मलिक, सुप्रिया सुळे अशा विविध पक्षांच्या नेत्यांसह अभिनेता रितेश देशमुख, जॉन अब्राहम, अनुपम खेर, बोमन इराणी, क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांनीही या दुर्घटनेविषयी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Do not bullet train, local improve! Mumbaikars expressed their anger over social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.