रेडिएशनच्या भीतीने बॅग तपासणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 05:03 AM2018-07-19T05:03:54+5:302018-07-19T05:04:02+5:30

आयकर विभागाचे मुंबईतील मुख्यालय असलेल्या चर्चगेटजवळील आयकर भवनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्कॅनरमुळे निर्माण होणा-या रेडिएशनचा धोका पोहोचण्याची भीती व्यक्त करत त्यांच्या बॅगा व जेवणाचे डबे तपासण्यास बुधवारी नकार दिला.

Do not check the bag due to radiation | रेडिएशनच्या भीतीने बॅग तपासणी नाही

रेडिएशनच्या भीतीने बॅग तपासणी नाही

Next

- खलील गिरकर 
मुंबई : आयकर विभागाचे मुंबईतील मुख्यालय असलेल्या चर्चगेटजवळील आयकर भवनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्कॅनरमुळे निर्माण होणा-या रेडिएशनचा धोका पोहोचण्याची भीती व्यक्त करत त्यांच्या बॅगा व जेवणाचे डबे तपासण्यास बुधवारी नकार दिला. याच पार्श्वभूमीवर सर्वांना समान नियम लागू करावा, अशी मागणी करत कनिष्ठ अधिकारी व कर्मचाºयांनीही तपासणीला नकार दिला आहे. त्यामुळे बुधवारी आयकर भवनात प्रवेश करणाºया आयकर विभागाच्या कोणत्याही कर्मचाºयाची, अधिकाºयाची बॅग तपासली गेली नाही.
आयकर भवनात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारावर धातू शोधक कमानीमधून प्रवेश करावा लागतो. प्रवेश करणाºया व्यक्तीकडील बॅगांची व पिशव्यांची तपासणी करण्यासाठी त्या वस्तू स्कॅनरमध्ये टाकाव्या लागतात. मात्र, या स्कॅनरमुळे निर्माण होणाºया रेडिएशनची भीती व्यक्त करीत अधिकाºयांनी या स्कॅनरमध्ये जेवणाचे डबे व इतर पिशव्या टाकण्यास बुधवारी नकार दिला. त्यामुळे वर्ग १ व वर्ग २चे अधिकारी वगळून केवळ वर्ग ३च्या अधिकारी व कर्मचाºयांच्या पिशव्या व बॅगा स्कॅनिंग करण्यात येत होत्या. यामुळे संतापलेल्या वर्ग ३च्या अधिकारी व कर्मचाºयांनी या प्रकाराला विरोध करीत आपल्या बॅगा व पिशव्या तपासण्यासही नकार दिला. रेडिएशनची भीती असेल तर ती सर्वांनाच आहे. त्यामध्ये वरिष्ठ किंवा कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी असा भेद कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करीत इन्कम टॅक्स एम्प्लॉईज फेडरेशन, मुंबई या संघटनेने आयकर भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नोटीस लावून कोणीही बॅगा तपासणीसाठी स्कॅनिंगसाठी न टाकण्याचे आवाहन केले. यामुळे बुधवारी दिवसभर कोणत्याही अधिकारी, कर्मचाºयाने बॅग स्कॅनिंग केली नाही. आयकर भवनात प्रवेश करणाºया प्रत्येकाची काटेकोर तपासणी होणे आवश्यक असताना या वादामुळे बुधवारी आयकर भवन इमारतीची सुरक्षा वाºयावर असल्याचे चित्र पाहायला मिळाले. याबाबत, आयकर भवनाच्या अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
>समान नियम हवा
जो नियम वरिष्ठ अधिकाºयांना तोच कनिष्ठ कर्मचाºयांनाही
लागू करणे गरजेचे आहे. अधिकाºयांना एक न्याय व कर्मचाºयांना दुसरा न्याय अशी वागणूक सहन केली जाणार नाही, असा इशारा या प्रकारानंतर वर्ग ३च्या अधिकारी व कर्मचाºयांनी दिला
आहे. आयकर भवनात प्रवेश करणाºया प्रत्येकाला सुरक्षेच्या दृष्टीने समान नियम लागू करणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Do not check the bag due to radiation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई