Join us  

विकासकामात अडथळे निर्माण करू नका

By admin | Published: October 13, 2014 11:01 PM

प्रत्येक राजकीय पक्षांनी कालच्या सुट्टीच्या दिवसाचा प्रचारासाठी पुरेपुर वापर केला.

वसई : प्रत्येक राजकीय पक्षांनी कालच्या सुट्टीच्या दिवसाचा प्रचारासाठी पुरेपुर वापर केला. बहुजन विकास आघाडीचे वसईतील उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी रॅलीच्या माध्यमातून प्रचंड शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीमुळे संपूर्ण वसई मतदारसंघ ढवळून निघाला. या रॅलीमध्ये हजारो युवक -युवती सहभागी झाल्या होत्या. जाहीर सभेत बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या भाषणात हजारो कोटीची विकासकामे विविध क्षेत्रत झाली, पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरीता देहर्जे प्रकल्प कार्यान्वित करीत आहोत, विरोधकांनी फक्त या कामात अडथळे निर्माण करू नयेत असे आवाहन केले.
माणिकपुर क्रिकेट मैदानावर झालेल्या जाहीर सभेत बोलताना बविआचे माजी खा. बळीराम जाधव, आ. क्षितीज ठाकूर व आ. विलास तरे या तिघांनी या उपप्रदेशाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठय़ा प्रमाणात निधी आणला. सोयी-सुविधा, दळणवळण, उद्योग, रोजगार, आरोग्य, इंधन, शेती, मासेमारी व अन्य क्षेत्रत या निधीतून मोठय़ा प्रमाणात विकासकामे करण्यात आली. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याकरीता आम्ही देहर्जे प्रकल्प सुरू केला आहे. भविष्यात या उपप्रदेशाला 9क्क् द.ल.ली. पाणी मिळणार आहे. फक्त विरोधकांनी या कामात अडथळे निर्माण करू नयेत अशी आमची अपेक्षा आहे. यापूर्वीचा अनुभव वाईट असल्यामुळे मी विरोधीपक्षांना या जाहीर सभेतून आवाहन करत आहे. या आवाहनास त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो, असे ते म्हणाले. जाहीर सभेला हजारो नागरीकांची लक्षणीय उपस्थिती होती. या उपस्थितीबाबत बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले, लोकांचे प्रेम हाच माझा ठेवा आहे. त्यामुळे माङया प्रत्येक कार्याला त्यांचा चांगला प्रतिसाद लाभतो. त्या जोरावरच मी विरोधकांना सामोरे जात असतो. रॅलीमध्ये सिनेअभिनेता गोविंदा आहुजा सहभागी झाला होता.