लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:06 AM2021-01-14T04:06:02+5:302021-01-14T04:06:02+5:30
मुंबई पोलिसांचे आवाहन : गरज पडल्यास ‘ग्रीन कॉरिडोअरची’ही तयारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लस साठवणूक केंद्राभोवती मुंबई पोलिसांनी ...
मुंबई पोलिसांचे आवाहन : गरज पडल्यास ‘ग्रीन कॉरिडोअरची’ही तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लस साठवणूक केंद्राभोवती मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. लसीकरणादरम्यान गरजेनुसार, ‘ग्रीन कॉरिडोअर’ उपलब्ध करून दिला जाईल, असे पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी सांगितले. या केंद्रांबाहेर गर्दी करू नका, असे आवाहनही बुधवारी त्यांनी नागरिकांना केले.
शनिवार (दि. १६)पासून देशभरात लसीकरण सुरू हाेईल. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात १३ ठिकाणी लसी पाठविण्यात आल्या आहेत. लसीचा पहिला साठा बुधवारी मुंबईत दाखल झाला. सुरक्षेच्या दृष्टीने लस साठवणूक केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. साठवणूक केंद्र आणि लसीकरण केंद्रांवर विनाकारण गर्दी होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे चैतन्या यांनी सांगितले.
........................................