लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या आठवड्यात मुंबईतील नामांकित खासगी रुग्णालयाने डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसविरोधात होर्डिंग लावले होते. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात एकच गदारोळ झाला. इंडियन मेडिकल असोसिएशननेही रुग्णालयास होर्डिंग हटविण्यास सांगितले होते. परंतु, रुग्णालयाने आपल्या भूमिकेवर ठाम राहत कट प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले. याच प्रकारातून प्रेरणा घेत आता वन रुपी क्लिनिकनेही ‘से नो टू कट प्रॅक्टिस’ ही नवी मोहीम सुरू केली आहे.वन रुपी क्लिनिकनेही आपल्या केंद्रांवर या मोहिमेविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून रुग्णांमध्ये कट प्रॅक्टिसविषयी अधिकाधिक जागरूकता आणण्यासाठी ही मोहीम हाती घेतली असल्याचे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले. या मोहिमेला उद्देशिणारी भित्तीपत्रके, संदेश वन रुपी क्लिनिक्सच्या केंद्रांमध्ये लावण्यात आले आहेत. वैद्यकीय सेवा ही ईश्वरी सेवा मानली जाते. रुग्णांच्या दृष्टीने डॉक्टर देव असतो. वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकता आणि ‘कट प्रॅक्टिस’चा शिरकाव झाल्याने वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे. रुग्णांकडे संवेदनशील वृत्तीने पाहून डॉक्टरांनी ‘कट प्रॅक्टिस’ थांबविली पाहिजे. डॉक्टर-रुग्णांमधील सलोखा वाढला पाहिजे. रुग्णांना वैद्यकीय माहिती ही अर्थातच कमी असल्याने वैद्यकीय फसवणुकीची, आर्थिक शोषणाची तसेच गैरसमजांची शक्यता वाढते. कोणत्याही वैद्यकीय घटनाक्रमात कमीजास्त जोखीम व धोका अंतर्भूतच असतो. मात्र यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये विश्वासाचे नाते असायला पाहिजे, असेही डॉ. घुले यांनी सांगितले.कट प्रॅक्टिस म्हणजे काय? विशिष्ट औषधे लिहून देण्यासाठी, विशिष्ट औषधविक्रेत्याकडूनच औषधे खरेदी करण्यास सांगण्यासाठी कमिशन घेणेरुग्णाला विशिष्ट प्रयोगशाळेतूनच चाचण्या करून घेण्यास सांगण्यासाठी कमिशन घेणे, औषध कंपन्यांकडून मिळणाऱ्या परदेशी सहलींच्या संधी घेणे. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कोणतेही कमिशन किंवा भेटवस्तू स्वीकारणे
डॉक्टर कमिशनविरोधात ‘से नो टू कट प्रॅक्टिस’
By admin | Published: June 18, 2017 2:56 AM