Join us

राम जन्मभूमी चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबला प्रदर्शित करू नका; हायकोर्टाने रोखले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 7:11 PM

चित्रपटाचे निर्माते वसीम रिझवी यांना या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि अन्य सामग्रीला सोशल मीडिया आणि चित्रपटगृहांतून वगळण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत अशी याचिकाकर्त्यांचे वकील राईद काजी यांनी ही माहिती दिली.  

ठळक मुद्देहायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गावर अडथळे निर्माण झाले अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात दंगली झाल्या होत्या.चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बाबरी पाडल्यानंतर झालेला गोळीबार त्यामध्ये कार सेवकांचा झालेला मृत्यू, तीन तलाक तसेच हलालासहित अनेक बाबी दाखवण्यात आल्या आहेत.

मुंबई - ‘राम जन्मभूमी’ या नव्या चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबला प्रदर्शित करण्यापासून हायकोर्टाने रोखले आहे. तसेच या चित्रपटाचे निर्माते वसीम रिझवी यांना या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि अन्य सामग्रीला सोशल मीडिया आणि चित्रपटगृहांतून वगळण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत अशी याचिकाकर्त्यांचे वकील राईद काजी यांनी ही माहिती दिली.  

'राम जन्मभूमी' हा चित्रपट अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशिदीवरुन सुरु असलेल्या वादाच्या मुद्द्यावर  आधारित आहे. याच्या ट्रेलरमध्ये राजकारणाच्या नावावर हिंदू आणि मुस्लिमांना आपापसात वाटले जात असून राजकीय नेते त्याचा फायदा घेत आहेत असे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनोज मिश्रा यांनी केले आहे. तर वसीम रिझवी या चित्रपटाचे लेखक आणि निर्माते आहेत. या चित्रपटात मनोज जोशींनी महत्वाची भूमिका  साकारली आहे. या चित्रपटाला लवकरात लवकर प्रदर्शित केले जावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, आता हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गावर अडथळे निर्माण झाले आहेत. अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात दंगली झाल्या होत्या. त्यानंतरपासून हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बाबरी पाडल्यानंतर झालेला गोळीबार त्यामध्ये कार सेवकांचा झालेला मृत्यू, तीन तलाक तसेच हलालासहित अनेक बाबी दाखवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :उच्च न्यायालयबॉलिवूडन्यायालय