केबिन कू्रवर अन्याय करू नका, डीजीसीएला कर्मचाऱ्यांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:26 AM2018-06-11T04:26:11+5:302018-06-11T04:26:11+5:30

विमानांमध्ये विविध सेवा देणाºया केबिन क्रू संदर्भात फ्लाइट ड्युटी टाइम व फ्लाइट टाइम लिमिटेशन (एफडीटीएल)मध्ये प्रस्तावित विविध शिफारशींमध्ये सुधारणा करण्याची मागणी विविध विमान कंपन्यांच्या केबिन कू्रकडून नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए)कडे करण्यात आली आहे.

Do not do injustice to cabin crew | केबिन कू्रवर अन्याय करू नका, डीजीसीएला कर्मचाऱ्यांचे साकडे

केबिन कू्रवर अन्याय करू नका, डीजीसीएला कर्मचाऱ्यांचे साकडे

Next

- खलील गिरकर
मुंबई  - विमानांमध्ये विविध सेवा देणाºया केबिन क्रू संदर्भात फ्लाइट ड्युटी टाइम व फ्लाइट टाइम लिमिटेशन (एफडीटीएल)मध्ये प्रस्तावित विविध शिफारशींमध्ये सुधारणा करण्याची मागणी विविध विमान कंपन्यांच्या केबिन कू्रकडून नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए)कडे करण्यात आली आहे. या प्रस्तावित शिफारशींमध्ये आणखी बदल करून केबिन क्रूना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत १३ जूनपर्यंत कर्मचाºयांकडून हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत.
कमाल फ्लाइट टाइम आठ तासांऐवजी ७ तास ५९ मिनिटे करावा, सध्या आठ तासापर्यंतच्या फ्लाइट टाइमसाठी कमाल कामाची वेळ १२ तास देण्यात आली आहे, ती कमी करून १० तास करावी, या कालावधीत लँडिंगची संख्या कमाल सहा प्रस्तावित करण्यात आली आहे, त्याऐवजी चार करावी, आठ तास ते ११ तासांच्या फ्लाइट टाइमसाठी कमाल कामाचे १५ तास प्रस्तावित आहेत ते कायम ठेवावेत. मात्र, या कालावधीत लँडिंगची संख्या तीन ऐवजी दोन करावी, असे बदल सुचवण्यात आले आहेत. तर ११ तास ते १६ तासांच्या फ्लाइट टाइमसाठी कमाल कामाची वेळ १८ तास व लँडिंगची संख्या एक प्रस्तावित करण्यात आली आहे, त्याला कर्मचाºयांनी अनुकूलता दर्शवली आहे. कामावर असताना काही काळ विश्रांतीसाठी मुक्त वेळ देण्याऐवजी कर्मचाºयाला साप्ताहिक सुटी हा शब्द वापरण्यात यावा. किमान विश्रांतीसाठी जितके तास काम केले तेवढा काळ किंवा ११ तास द्यावी, असे प्रस्तावित करण्यात आले त्यामध्ये कर्मचाºयांनी सुधारणा सुचवून विश्रांतीची वेळ जितके तास काम केले तेवढा काळ अधिक दोन तास प्रवासासाठी किंवा १५ तास द्यावी, असे सांगितले आहे.

विमान कंपन्यांच्या कामकाजावर विपरित परिणाम
सध्याच्या फ्लाइट ड्युटी व फ्लाइट टाइम लिमिटेशनच्या नियमांमुळे केबिन क्रूना अनेक वैद्यकीय समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. विमान प्रवासात प्रवाशांना सेवा पुरवणारा हा वर्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. या वर्गाला जाचक अटी व नियमांना सामोरे जावे लागले तर त्याचा फटका त्या कर्मचाºयांना व्यक्तिगत स्वरूपात तर बसेलच मात्र त्याच वेळी त्याचा विमान कंपन्यांच्या कामकाजावर विपरित परिणाम होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे.

नॅरो बॉडी विमानांमध्ये फ्लाइट ड्युटी वेळ ६० मिनिटे करावा व वाइड बॉडी विमानांमध्ये फ्लाइट ड्युटी वेळ ९० मिनिटे करावी, असे कर्मचाºयांनी सुचवले आहे. एका आठवड्यात कमाल तीन वेळा रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीत उड्डाण-लँडिंग करता येईल, असे डीजीसीएने प्रस्तावित केले आहे. मात्र, विरोध दर्शवत अशी ड्युटी ३ आठवड्यांत एकदा द्यावी, असे कर्मचाºयांनी सुचवले आहे.

Web Title: Do not do injustice to cabin crew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.