मुंबई : नो पार्किं गमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमध्ये वाहनचालक, मालक किंवा इतर कोणतीही व्यक्ती बसलेली असेल तर ते वाहन टो करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.टोइंग वाहनाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून, अनेक ठिकाणी वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना वादाला सामोरे जावे लागते. परिणामी असे वाद भविष्यात होऊ नयेत म्हणून वाहतूक विभागाने परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, टोइंग वाहनावर साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाºयाची नियुक्ती करण्यात यावी.टोइंग वाहनांवरील पोलीस कर्मचाºयाकडे ई-चलान मशीन व वॉकीटॉकी देण्यात यावे. टोइंगची कारवाई सुरू करण्यापूर्वी तेथे मेगाफोनद्वारे आवाहन करावे. जर कोणी तेथे आले नाही तरच टोइंगची कारवाई करावी. मेगाफोनद्वारे आवाहन करताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.उद्धट वर्तन नको- अनधिकृतरीत्या उभ्या असलेल्या वाहनांचे टोइंग केल्यावर वाहतूक चौकीला वाहन पोहोचवण्यापूर्वी मध्येच जर संबंधित वाहनाचे मालक/चालक ई-चलानद्वारे आॅनलाइन पद्धतीने तडजोड रक्कम भरण्यास तयार असतील तर तडजोड रक्कम टोइंग चार्जेससह ई-चलानद्वारे आॅनलाइन भरून वाहन तेथेच सोडण्यात यावे.- नो पार्र्किं गमध्ये वाहन उभे असेल व ते वाहन टो करण्यापूर्वी किंवा टोइंगची कार्यपद्धती पूर्ण होण्यापूर्वी जर कोणी वाहनचालक किंवा इतर तेथे असल्यास फक्त नो पार्किंगची तडजोड रक्कम स्वीकारून वाहन सोडण्यात यावे. टोइंग चार्जेस घेण्यात येऊ नयेत. टोइंग वाहनावरील खासगी कर्मचारी वाहनचालक किंवा इतरांशी उद्धट वर्तन करणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही परिपत्रकात नमूद आहे.
...तर वाहन टोइंग करू नका! वाहनात कोणीही व्यक्ती असल्यास खबरदारी घ्या - अमितेश कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 4:01 AM