बालकांना जात-धर्मात अडकवू नका - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 05:24 AM2018-03-14T05:24:18+5:302018-03-14T05:24:18+5:30
सहा वर्षांखालील बालकांना तरी जात-धर्मात अडकवू नका. राज्यात धर्म, जात, पंथाच्या आधारावर अंगणवाड्या चालवल्या जाणार नाहीत, अशी भूमिका महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत मांडली.
मुंबई : सहा वर्षांखालील बालकांना तरी जात-धर्मात अडकवू नका. राज्यात धर्म, जात, पंथाच्या आधारावर अंगणवाड्या चालवल्या जाणार नाहीत, अशी भूमिका महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत मांडली.
राज्यात उर्दू माध्यमाच्या अंगणवाड्या सुरू करण्याबाबतचा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केला होता. ज्या अंगणवाडीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मुले मराठीव्यतिरिक्त इतर बोली भाषेतली असतील तर तेथे ती भाषा येणारी अंगणवाडी सेविका व तिची मदतनीस असेल, असेही मुंडे म्हणाल्या. या वेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मंत्री तांत्रिक उत्तर देत असल्याचा आरोप करत गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. त्यावर, तांत्रिक उत्तरातूनच प्रश्न सुटतात, अशा शब्दांत पंकजा यांनी विरोधकांना सुनावले.
>जिपत ३० टक्के कपात
जिल्हा परिषदेच्या सरळसेवेच्या कोट्यातली रिक्त पदे आॅनलाइन पद्धतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वित्त विभागाच्या निर्णयानुसार ३० टक्के पदांमध्ये कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.