अल्पसंख्याक आयोगाची पदे भरू नका

By admin | Published: February 4, 2015 02:31 AM2015-02-04T02:31:41+5:302015-02-04T02:31:41+5:30

अल्पसंख्याक आयोगाचे कोणतेही पद भरू नका, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले़

Do not fill the post of minority commission | अल्पसंख्याक आयोगाची पदे भरू नका

अल्पसंख्याक आयोगाची पदे भरू नका

Next

मुंबई : अल्पसंख्याक आयोगाचे कोणतेही पद भरू नका, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले़
याप्रकरणी जेनेट डिसोजा व इतरांनी याचिका केली आहे़ याचिकाकर्त्यांची या आयोगावर गेल्या वर्षी नियुक्ती झाली होती़ पण त्यांना या पदावरून काढून टाकण्यात आले़ याविरोधात त्यांनी ही याचिका केली आहे़
न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ गेल्या वर्षीच या आयोगावर आमची नियुक्ती झाली आहे़ ही नियुक्ती पाच वर्षांसाठी असते़ या काळात एखाद्या प्रकरणात शिक्षा झाली अथवा आम्ही कामचुकारपणा केला तरच आम्हाला या पदावरून काढून टाकण्याचे अधिकार शासनाला आहेत़ असे असतानाही आम्हाला या आयोगावरून काढून टाकण्यात आले, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला़ तसेच या आयोगावर आता निुयक्ती न करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला द्यावेत, अशीही विनंती याचिकाकर्त्यांनी केली़ ती ग्राह्य धरीत न्यायालयाने वरील अंतरिम आदेश देत शासनाला या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्याचे निर्देशही दिले़ यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Do not fill the post of minority commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.