मुंबई : येस बँक घोटोळा आणि मृत गँगस्टर इकबाल मिर्ची याच्या जमीन विक्री दलाली प्रकरणात सहभागी असलेल्या कपिल वाधवान आणि त्याचा भाऊ धीरज यांची जामिनावर सुटका करू नये, असे पत्र केंद्रीय गुन्हा अन्वेषन विभागाने (सीबीआय) सातारा जिल्हा सत्र न्यायालयाला लिहिले आहे.
लॉकडाऊनच्या काळात खंडाळा ते महाबळेशवर पर्यटन करीत असताना सातारा पोलिसांनी वाधवान बंधूसह 23 जणांना अटक केली आहे. त्याच्या पाच आलिशान मोटारीही जप्त केल्या आहेत. गृह विभागातील प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटरहेडवर पत्र घेऊन ते हा प्रवास करीत होते.
वाधवान बंधूविरुद्ध सीबीआयने कोर्टातून अजामीन पात्र (नॉनबेलेबल ) वारेंट जारी केले आहे. मात्र वाधवान बंधूनी चॊकशीचा ससेमिरा लांबविण्यासाठी कोरोना व्हयरसमुळे कोरनटाईन असल्याचे सीबीआयला कळविले होते. मात्र त्याच्या पर्यटनामुळे खरा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सीबीआयने सातारा न्यायालयाला पत्र लिहून कपिल व धीरज वाधवान हे सीबीआयकडे दाखल गुन्हात पाहिजे आरोपी असल्याने त्याची जामीनावर सुटका करू नये, अशी विनंती केली आहे.त्यामुळे तेथील कोठडीची मुदत संपल्यानंतर सीबीआय त्यांना ताब्यात घेणार आहे.