CoronaVirus News: विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कोणतीही वाढ करू नका; शालेय शिक्षण विभागाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:00 PM2020-05-08T15:00:02+5:302020-05-08T15:04:02+5:30

पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करून त्याप्रमाणे शिक्षण संस्थांनी योग्य प्रमाणात फी कमी करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढले.

Do not increase student fees; Order of the Department of School Education vrd | CoronaVirus News: विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कोणतीही वाढ करू नका; शालेय शिक्षण विभागाचा आदेश

CoronaVirus News: विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कोणतीही वाढ करू नका; शालेय शिक्षण विभागाचा आदेश

Next
ठळक मुद्देइतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या गेल्या वर्षातील कामगिरीनुसार युजीसीच्या नियमावलीप्रमाणे त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे.विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कोणतीही वाढ करू नका; असा आदेशही शालेय शिक्षण विभागानं काढला आहे. शैक्षणिक वर्ष 2019- 20 व 2020- 21 मधील देय/शिल्लक फी वार्षिक एकदाच न घेता मासिक/ त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय पालकांना द्यावा, असे पर्यायही उपलब्ध करून देण्यास सांगितलं आहेत.

मुंबईः अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या गेल्या वर्षातील कामगिरीनुसार युजीसीच्या नियमावलीप्रमाणे त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कोणतीही वाढ करू नका; असा आदेशही शालेय शिक्षण विभागानं काढला आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोणतीही फी वाढ करू नये. शैक्षणिक वर्ष 2019- 20 व 2020- 21 मधील देय/शिल्लक फी वार्षिक एकदाच न घेता मासिक/ त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय पालकांना द्यावा, असे पर्यायही उपलब्ध करून देण्यास सांगितलं आहेत. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही व त्याबाबतचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करून त्याप्रमाणे शिक्षण संस्थांनी योग्य प्रमाणात फी कमी करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढले.

इतरही काही महत्त्वाचे निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतले आहेत. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने या महाविद्यालयीन व विद्यापीठांच्या परीक्षांबाबत घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आणि निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पुढील वर्गात गेल्यानंतर आपली श्रेणी कमी आहे, असे वाटले तर ऐच्छिक परीक्षा देण्याचा पर्याय त्यांना पुढील वर्षी उपलब्ध असणार आहे. त्याचे नियोजन विद्यापीठाच्या वेळापत्रकाप्रमाणे असणार आहे. 

नापास होणाऱ्या विद्यार्थ्याना ही यंदा पुढील वर्गात जाण्याची संधी उपलब्ध होईल, मात्र पुढील वर्गात गेल्यानंतर पुढच्या वर्षी त्याना ते नापास झालेल्या विषयांची परीक्षा विद्यापीठाच्या नियोजनाप्रमाणे द्यावी लागणार आहे. शेवटच्या वर्षाच्या निकालावर विद्यार्थ्यांचे करिअर अवलंबून असल्याने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यात येणार असून त्यामध्ये सोशल डिस्टंसिन्गचे नियम पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सीईटीच्या परीक्षांच्या बाबतीत येत्या ८ दिवसांत जाहीर करण्यात येईल.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: औरंगाबादमधील रेल्वे अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल; रेल्वे मंत्र्यांना दिल्या सूचना

लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

'गावी जाऊ इच्छिणाऱ्या, शहरात अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार'

Coronavirus: आता पोस्टानं होणार कोरोना टेस्टिंग किट्सची डिलिव्हरी; ICMRनं केला करार

Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती, खासगी नोकर निघाला संक्रमित

Web Title: Do not increase student fees; Order of the Department of School Education vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.