‘गार्ड लोकल चालवत असल्याचे माहीत नाही’

By admin | Published: December 10, 2015 02:28 AM2015-12-10T02:28:47+5:302015-12-10T02:28:47+5:30

सीएसटी स्थानकात लोकल बफरला धडकल्याची घटना मंगळवारी घडली. मोटरमने रेल्वेकडे दिलेल्या जबाबात गार्ड लोकल चालवत असल्याचे माहीत नसल्याचे सांगितले आहे.

'Do not know that the guard is running locally' | ‘गार्ड लोकल चालवत असल्याचे माहीत नाही’

‘गार्ड लोकल चालवत असल्याचे माहीत नाही’

Next

मुंबई : सीएसटी स्थानकात लोकल बफरला धडकल्याची घटना मंगळवारी घडली. मोटरमने रेल्वेकडे दिलेल्या जबाबात गार्ड लोकल चालवत असल्याचे माहीत नसल्याचे सांगितले आहे. मोटरमनकडून नोंदविण्यात आलेल्या या जबाबामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून लोकल चालवत होत तरी कोण हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सीएसटीवर पहाटे अडीचच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर लोकल बफरवर धडकली. या धडकेत बफरचे नुकसान तर झाले शिवाय गार्ड शंकर नाईक यात जखमी झाला. या घटनेनंतर रेल्वेकडून मोटरमन विजय खानोलकर आणि गार्ड नाईक यांना निलंबित करण्यात आले. तसेच चौकशी समितीही नेमून त्याचा महिनाभरात अहवालही सादर केला जाणार आहे. याबाबत मोटरमनकडून लेखी खुलासा मध्य रेल्वेला देण्यात आला असून गार्ड लोकल चालवत असल्याचे आपल्याला माहीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. कसाराहून आलेली ही लोकल त्या दिवशी प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आणण्यात आली. प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरुन दुरुस्तीसाठी बाहेर काढल्यानंतर पुढील सूचनेनुसार प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर आणण्यात येणार होती. त्यासाठी केबिनच्या दिशेने जात असताना अचानक लोकल सुरु होऊन पुढे जाऊन धडकली आणि मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकताच प्लॅटफॉर्मच्या दिशेने धाव घेतली आणि प्रकार उघडकीस आल्याचे यातून सांगितले आहे. मोटरमनच्या या जबाबामुळे अनेक उलटसुलट तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Web Title: 'Do not know that the guard is running locally'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.