पैशांसाठी आवड जपू नका - जगदीश अग्रवाल

By admin | Published: April 22, 2016 02:16 AM2016-04-22T02:16:41+5:302016-04-22T02:16:41+5:30

पैशांसाठी फोटोग्राफी करण्याऐवजी आपल्यामधील आवड जोपासण्यासाठी फोटोग्राफी केली तर आवडीला न्याय मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार जगदीश अग्रवाल यांनी केले.

Do not love for money - Jagdish Agarwal | पैशांसाठी आवड जपू नका - जगदीश अग्रवाल

पैशांसाठी आवड जपू नका - जगदीश अग्रवाल

Next

मुंबई : पैशांसाठी फोटोग्राफी करण्याऐवजी आपल्यामधील आवड जोपासण्यासाठी फोटोग्राफी केली तर आवडीला न्याय मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार जगदीश अग्रवाल यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधत पद्मश्री पुरस्कार प्राप्त ‘लोकमत’चे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांच्या अध्यक्षतेखाली ‘द ब्लू आयकॉन’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्र प्रदर्शनचा समारोप गुरुवारी जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाला.
या वेळी जगदीश अग्रवाल बोलत होते. याप्रसंगी चित्रपट निर्मात्या आणि छायाचित्रकार किरण राव,
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, कला समीक्षक महिंद्र दामले आणि नियती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगदीश अग्रवाल म्हणाले, चांगल्या छायाचित्रांसाठी भरपूर फिरण्याची गरज आहे. शिवाय छायाचित्रकार मित्रांशी चर्चा करण्याची गरज आहे. असे केले तरच तुमची छायाचित्रे अधिक बोलकी होतील. किरण राव म्हणाल्या की, माझ्यासाठी फोटोग्राफी कवितेसारखी आहे. एकाच वेळी ती अनेक अर्थ आपल्यासमोर उलगडते. उज्ज्वल निकम म्हणाले की, छायाचित्र अत्यंत बोलकी असतात.
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यात जीव धोक्यात घालून छायाचित्रकारांनी अजमल कसाबची छायाचित्रे काढली. पुराव्यादाखल असलेल्या त्याच्या छायाचित्रांमुळेच त्याला शिक्षा देणे शक्य झाले. त्यामुळे छायाचित्रकार ही जबाबदारी आहे. त्याचा योग्य वापर समाजाप्रति व्हायला हवा.
१८ एप्रिलपासून हे प्रदर्शन येथे भरविण्यात आले होते. प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील क्षणचित्रे मांडण्यात आली होती. या वेळी जगदीश
अग्रवाल यांना त्यांच्या कार्याबद्दल ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Do not love for money - Jagdish Agarwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.