शेवटची लोकल चुकवू नका
By admin | Published: December 17, 2015 02:35 AM2015-12-17T02:35:14+5:302015-12-17T02:35:14+5:30
कसाईवाडा पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वे मेन लाइन व हार्बरवरील सहा मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. १९ डिसेंबरच्या रात्री पावणे बारा वाजल्यापासून जवळपास आठ तासांचा
मुंबई : कसाईवाडा पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वे मेन लाइन व हार्बरवरील सहा मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. १९ डिसेंबरच्या रात्री पावणे बारा वाजल्यापासून जवळपास आठ तासांचा ब्लॉक घेतला जाईल. सीएसटीहून शेवटची लोकल कर्जतसाठी रात्री साडे अकरा वाजता आणि पनवेलसाठी रात्री अकरा वाजता सुटेल. त्यामुळे शेवटची लोकल चुकवू नका, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
कसाईवाडा पुलामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, पूल पूर्णपणे तोडून तो नव्याने बनविताना त्याची उंची वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी १९ डिसेंबरला अप आणि डाउन धीम्या मार्गावर मध्यरात्री 00.२0 ते पहाटे ४.२0, अप आणि डाउन जलद मार्गावर रात्री पावणे बारा ते पहाटे सव्वा पाच, अप आणि डाउन हार्बर मार्गावर रात्री पावणे बारा ते सकाळी पावणे आठ, तर अप आणि डाउन मालवाहतूक मार्ग व सायडिंग मार्गांवर रात्री पावणे बारा ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसटीहून अंबरनाथला सुटणारी रात्री ११.५२ वाजताची ट्रेन ही याच वेळेत कुर्ल्याहून सोडण्यात येईल. त्याचप्रमाणे, सीएसटीहून ते कसारा मध्यरात्री १२.१0 वाजताची आणि सीएसटी ते कर्जत मध्यरात्री साडे बारा वाजताची ट्रेनही कुर्ला स्थानकातून सोडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
ब्लॉक दरम्यानचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे...
मध्य रेल्वे : मेन लाइन
- २0 डिसेंबर रोजी सीएसटीहून कसारासाठी पहिली लोकल नेहमीप्रमाणे ४.१२ वाजता सुटेल.
तर याच दिवशी कर्जतहून सीएसटीसाठी पहिली लोकल ४.५८ वाजता सोडण्यात येईल.
सीएसटी ते पनवेल मार्ग
- १९ डिसेंबर रोजी सीएसटी ते पनवेल शेवटची लोकल रात्री ११ वाजता आणि कुर्ल्याहून पनवेलसाठी रात्री ११.२८ वाजता सोडण्यात येईल.
- १९ डिसेंबर रोजी पनवेलहून सीएसटीसाठी शेवटची लोकल मानखुर्दहून २१.३८ वाजता सुटून सीएसटीला २२.५५ वाजता पोहोचेल.
- २0 डिसेंबर रोजी सीएसटीहून पनवेलसाठी पहिली लोकल
सकाळी ८.0५ वाजता व कुर्ल्यासाठी ८.३३ वाजता सोडण्यात येईल.
- २0 डिसेंबर रोजी वाशीहून सीएसटीसाठी पहिली लोकल स. ७.३२ वा. व पनवेलहून सीएसटीसाठी सकाळी ७.0८ वाजता सुटेल.
सीएसटी ते अंधेरी हार्बर मार्ग
- १९ डिसेंबर रोजी सीएसटीहून वान्द्रासाठी शेवटची लोकल रात्री २३.२३ वाजता सुटेल व अंधेरीसाठी सीएसटीहून २३.0७ वा. सोडण्यात येईल.
- अंधेरीहून सीएसटीसाठी शेवटची लोकल रात्री २३.५६
वाजता सुटून आणि सीएसटीला 00.३८ वाजता पोहोचेल.
- २0 डिसेंबर रोजी सीएसटीहून अंधेरीसाठी
पहिली लोकल सकाळी ५.१२ वाजता सुटेल.
- २0 डिसेंबर रोजी वान्द्रेहून सीएसटीसाठी पहिली लोकल सकाळी ४.५३ वाजता सुटेल, तर अंधेरीहून सीएसटीसाठी सकाळी ६.0५ वाजता सुटेल.
२0 डिसेंबरचे काही एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक
सीएसटी-वाराणसी एक्सप्रेस 00.१0 ऐवजी 0४.00 वाजता सुटेल.
सीएसटी ते मडगाव मांडवी एक्स्प्रेस सकाळी ७.१0 च्या ऐवजी सकाळी ८.२५ वाजता सुटेल.
सीएसटी ते बेंगलुरु उदयन एक्सप्रेस सकाळी ८.0५ च्या ऐवजी सकाळी 0९.0५ वाजता सोडण्यात येईल.