‘अपूर्णावस्थेतील सावरकर पूल वाहतुकीसाठी खुला करू नये’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 02:55 AM2018-08-16T02:55:50+5:302018-08-16T02:55:59+5:30

गोरेगाव पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या विस्तारित उड्डाण पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे सर्व कामे झाल्याशिवाय या पुलाचे लोकार्पण करू नये

'Do not open the Savarkar bridge in the inconvenience for traffic' | ‘अपूर्णावस्थेतील सावरकर पूल वाहतुकीसाठी खुला करू नये’

‘अपूर्णावस्थेतील सावरकर पूल वाहतुकीसाठी खुला करू नये’

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - गोरेगाव पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या विस्तारित उड्डाण पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे सर्व कामे झाल्याशिवाय या पुलाचे लोकार्पण करू नये, तसेच या पुलाचे लोकार्पण मुंबई महानगर पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमार्फत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या आदेशाने घेण्यात यावे, असे निर्देश आपण पालिका प्रशासनाला दिल्याची माहिती स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) साधना माने यांनी दिली.
स्वातंत्र्य दिनी सदर पूल वाहतुकीस खुला करावा. लोकार्पण नंतर करावे, अशी भूमिका भाजपाचे नगरसेवक दीपक ठाकूर यांनी घेतली होती. राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनीही पुलाचा पाहणी दौरा केला होता. शिवसेना आणि भाजपामध्ये या विषयावरून ‘शीतयुद्ध’ रंगले होते. परिणामी, बुधवारी पूल खुला होणार की नाही? साधना माने यांनी सांगितले की, पुलाचे रंगकाम, बॅरिकेट्स काढणे ही कामे अपूर्ण असून, या पुलाच्या फिनिशिंगची कामे बाकी आहेत, तसेच या पुलावर वाहने उभी केल्याचे आढळून आले आहे. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत सदर पुलावर टाकण्यात आलेले बॅरिकेट्स काढावेत, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: 'Do not open the Savarkar bridge in the inconvenience for traffic'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.