मुंबई : बºयाचदा सतत आपल्या नाकातून पाणी येत असते. सर्दी झाली, असे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तसे न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन या समस्येविषयी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. नुकतेच कुर्ला येथील खासगी रुग्णालयात अशाच स्वरूपाची समस्या असणाºया २० वर्षीय तरुणावर ट्रान्सनसल अँडोस्कोपिक नॅव्हिगेशनल शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे.
मोहम्मद अरफाद खान यांच्या गेली ८-१० वर्षे उजव्या नाकपुडीतून सारखे पाणी यायचे. जरा खोकले किंवा थोडे खाली वाकले, तरीही पाणी यायचे. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले़ त्यांना वाटले सर्दी किंवा संसर्गामुळे होत असावे़, पण सगळ्या चाचण्या केल्यावर कळले, त्यांचा मेंदूतील द्रव (ब्रेन फ्लुइड) नाकाद्वारे बाहेर येत होते. ब्रेन फ्लुइड लीकमुळे जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. दुसºया रुग्णालयामधील न्यूरोसर्जनने यावरील उपायासाठी बाहेरून स्कल (कवटीचा भाग) उघडून शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले होते़, पण रुग्णाच्या नातेवाइकांनी त्याला कुर्ला येथील रुग्णालयात दाखल केले. कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजय हेलाले यांनी रुग्णाच्या नाकाद्वारे दुर्बिणीच्या साहाय्याने म्हणजेच, ट्रान्सनसल अँडोस्कोपिक नॅव्हिगेशनल सर्जरी यशस्वीपणे पार पाडली. हा युवक सेलिब्रोस्पायनल फ्लुइड रायनोरीया या आजाराने ग्रस्त होता. यामध्ये त्याच्या मेंदूतील पाणी (ब्रेन फ्लुइड) नाकाद्वारे बाहेर येत होते.याविषयी, डॉ. संजय हेलाले म्हणाले, एखाद्या मोठ्या अपघातामध्ये मेंदूला मार लागला, तर मेंदूंच्या आतील भागात चीर किंवा छिद्र पडून ‘सेलिब्रोस्पायनल फ्लुइड रायनोरीया’ हा आजार उद्भवतो. सगळ्या तपासण्या आणि अहवालानंतर नाकाद्वारे ट्रान्सनसल अँडोस्कोपिक नॅव्हिगेशनल सर्जरी करून ते छिद्र बुजविले. आता रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे.