मुंबई : माझगाव शिपबिल्डर्स ही जहाजबांधणीत अग्रेसर असलेली देशातील आघाडीची कंपनी असून, तिचे खासगीकरण न करता सक्षमीकरण करावे, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.माझगाव शिपबिल्डर्सचे निर्गुंतवणुकीद्वारे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, ही काही डबघाईस आलेली कंपनी नाही. सुरक्षा दलांसाठी युद्धनौका, विमानवाहू नौकांसह सर्वप्रकारच्या पाणबुड्यांची निर्मिती येथे केली जाते. वक्तशीरपणा, सातत्य आणि गुणवत्तेतही या कंपनीचा अव्वल क्रमांक लागतो. आजवर माझगाव गोदीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. असे असताना या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय न समजण्यापलीकडे असल्याचे सावंत यांनी सांगितले.या कंपनीला सुरक्षा साधनांच्या निर्मितीचे जास्तीत जास्त काम मिळत राहिल्यास उत्तरोत्तर वाढ होत राहील. त्यामुळे या कंपनीच्या खासगीकरणाची नव्हे तर सक्षमीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त करीत सावंत यांनी नियम ३७७ अन्वये लोकसभाध्यक्षांना निवेदन सादर केले आहे.हॉटेल चालकांना सोमवारची प्रतीक्षाहॉटेल चालकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या असून, त्यांनी हॉटेल सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, परंतु दुकाने सुरू करण्यात आली आहेत, त्याचा कोरोना रुग्णसंख्येवर काही परिणाम होतो का, ते पाहिले जाईल. सोमवारी टास्क फोर्स बैठक होणार आहे. त्यानंतर निर्णय जाहीर केला जाणार आहे.- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहारमुख्यमंत्र्यांनी नियम पाळले जात नसल्याने हॉटेल सुरू करण्यात आले नाही, असे सांगितले होते. आम्ही त्यांना नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करा, पण एकामुळे संपूर्ण इंडस्ट्री बंद ठेवू नका, हॉटेल व्यावसायिक अडचणीत आहे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केले आहे. सोमवारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.-गुरबक्षीस सिंग कोहली, उपाध्यक्ष, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया.
गोदीचे खासगीकरण नको, सक्षमीकरण करा- शिवसेना खासदार अरविंद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 7:26 AM