आरक्षणाचा निर्णय हाेत नाही तोपर्यंत भरती नकाे- विनायक मेटे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 05:53 AM2020-12-21T05:53:57+5:302020-12-21T05:54:20+5:30

Vinayak Mete : मराठा समाजातील विविध पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी वडाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय बैठकीसाठी उपस्थित होते.

Do not recruit till the decision of reservation is in hand- Vinayak Mete | आरक्षणाचा निर्णय हाेत नाही तोपर्यंत भरती नकाे- विनायक मेटे

आरक्षणाचा निर्णय हाेत नाही तोपर्यंत भरती नकाे- विनायक मेटे

Next

मुंबई : आरक्षणाचा निर्णय हाेत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये, असे मत शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी रविवारी मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत मांडले.
मराठा समाजातील विविध पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी वडाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय बैठकीसाठी उपस्थित होते. या वेळी मेटे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने नवीन कायदेतज्ज्ञांचा समावेश करून पुढील रणनीती ठरवावी. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार काय करणार याबाबत ४ जानेवारीपर्यंत सरकारने चर्चा करावी आणि जो निर्णय घेतला त्याबाबत पुन्हा मराठा समाजातील नेत्यांची बैठक घेऊन माहिती द्यावी. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये, असे ते म्हणाले. डिसेंबरपर्यंत सरकारने काहीच हालचाल केली नाही तर जानेवारीत बैठक घेऊन आगामी काळातील आंदोलन, रास्ता रोको, धरणे आंदोलन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
 

Web Title: Do not recruit till the decision of reservation is in hand- Vinayak Mete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.