पत्रिका पाहू नका, पण रक्तचाचणी करा!

By Admin | Published: May 9, 2017 01:08 AM2017-05-09T01:08:30+5:302017-05-09T01:08:30+5:30

समाज कितीही पुढारलेला असला, तरी आजही लग्नापूर्वी पत्रिका, कुंडल्या जुळतात का, हे पाहण्याची पद्धत रूढ आहे. मात्र, आजच्या

Do not see the magazine, but make blood tests! | पत्रिका पाहू नका, पण रक्तचाचणी करा!

पत्रिका पाहू नका, पण रक्तचाचणी करा!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समाज कितीही पुढारलेला असला, तरी आजही लग्नापूर्वी पत्रिका, कुंडल्या जुळतात का, हे पाहण्याची पद्धत रूढ आहे. मात्र, आजच्या समाजात थॅलेसेमिया या आजाराचीही तपासणी केली पाहिजे. कारण वधू-वर दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांची अपत्येही ‘थॅलेसेमियाग्रस्त’ जन्मतात. त्यामुळे जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या निमित्ताने थॅलेसेमियाविषयी समाजातील सर्व स्तरांत जनजागृती आवश्यक असल्याचे मत डॉक्टर मांडत आहेत. त्यातही लग्नापूर्वी वधू-वर दोघांनीही ही चाचणी करून घेणे अत्यावश्यक असल्याचेही डॉक्टर अधोरेखित करतात.
वंशपरंपरेने किंवा अनुवांशिकतेने जनुकांद्वारे मात्या-पित्याकडून आपल्याला अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होत असतात. यांचे एका पिढीतून पुढच्या पिढीत वहन होत असते. बीटा थॅलेसेमिया व्याधीत १ बिटा थॅलेसेमिया जनुक आई किंवा वडिलांकडून अपत्यात येते व काही वेळा दोघांकडून १/१ जनुक येते. परिणामी, होणाऱ्या बाळाला थॅलेसेमियाची व्याधी होते. थॅलेसेमियाविषयी डॉ. जयेश लेले यांनी सांगितले की, जनजागृतीसाठी समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांमध्ये प्रभावीपणे ही मोहीम राबविली पाहिजे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शासकीय आणि अशासकीय पातळीवर याविषयी प्रयत्न झाले पाहिजेत.
लहान मुलांमध्ये हिमोग्लोबिनची निर्मिती थांबते व त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. हिमोग्लोबिनचे प्रमाण हे आहारातून मिळणाऱ्या लोहावर अवलंबून असते. ही आनुवंशिक व्याधी आहे. ‘थॅलेसेमिया’ ही एक प्रकारची रक्तव्याधी आहे. या आजाराचे दोन प्रकार असतात.

Web Title: Do not see the magazine, but make blood tests!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.