Join us

गुन्हा दाखल होऊन आठ महिने कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 2:37 AM

चांदिवली परिसरात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन एसआरए इमारतीच्या साईटवर हलगर्जीपणे खोदकाम करून इमारतीला तडे निर्माण करून रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी शापूरजी पालनजी अ‍ॅण्ड कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन आठ महिने उलटले तरी साकीनाका पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई : चांदिवली परिसरात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन एसआरए इमारतीच्या साईटवर हलगर्जीपणे खोदकाम करून इमारतीला तडे निर्माण करून रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी शापूरजी पालनजी अ‍ॅण्ड कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन आठ महिने उलटले तरी साकीनाका पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान, कंपनीच्या पदाधिका-यांना वारंवार समन्स पाठवूनही तपासात सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी संबंधित पदाधिकारी तपासात सहकार्य करीत नसले तरी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून लवकरच संबंधितांवर कारवाई केली जाईल; तसेच तपासाचा अहवाल स्थानिक न्यायालयात सादर केला जाणार असल्याचे सांगितले.शापूरजी पालनजी कंपनीच्या वतीने चांदिवली परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. लगतच एक एसआरए इमारत असून या इमारतीत सातशेहून अधिक रहिवासी राहतात. निर्माणाधीन इमारतीचे खोदकाम करताना कंपनीच्या पदाधिकाºयांनी हलगर्जीपणा केल्याने या एसआरए इमारतीला तडे जाऊन ही इमारत धोकादायक झाली होती.साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीतील रहिवाशांना जवळच्या शाळेत स्थलांतरित केले होते. त्यानंतरयाच कंपनीने खोदकाम केलेला शंभर मीटर खड्डा बुजवून तिथे बांधकाम केले होते. कालांतराने या रहिवाशांना तिथे पुन्हा एसआरए इमारतीत राहण्याची परवानगी देण्यात आली होती.दुसरीकडे या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी हमीद अब्दुल करीम शेख यांच्या तक्रारीवरून शापूरजी पालनजी कंपनीच्या संबंधित पदाधिकाºयांविरुद्ध भादंवि कलम ३३६, ४३१, ४२७ अन्वये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. १४ जुलैला हा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी कंपनीकडे परवानगीसंदर्भात काही कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र कंपनीचे प्रतिनिधी अद्याप कागदपत्रांसह हजर झाले नाहीत. कंपनीने लेखी उत्तर सादर केले, मात्र या घटनेला जबाबदार असलेल्या पदाधिकाºयांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.